CBSE Board Exam Time table 2025 : ‘सीबीएसई’चे दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२५ च्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी १५ फेब्रुवारी २०२५ पासून या परीक्षा सुरू होणार आहेत.सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे ८६ दिवस आधी वेळापत्रक जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई)  २०२५ च्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी १५ फेब्रुवारी २०२५ पासून या परीक्षा सुरू होणार आहेत.सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध आहे.

इयत्ता दहावीच्या वेळापत्रकाव्यतिरिक्त, सीबीएसई बोर्डाने इयत्ता बारावीच्या परीक्षेची तारीखही घोषित केली आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी सुरू होणार आहेत. सीबीएसईने सांगितले की, विद्यार्थ्याने निवडलेल्या कोणत्याही २ परीक्षा एकाच तारखेला होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी ४० हजारांहून जास्त विषयांचे संयोजन टाळून वेळापत्रक तयार केले गेले आहे. सीबीएसईने परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे ८६ दिवस आधी वेळापत्रक जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २३ दिवस आधीच वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) वेळापत्रक तयार करताना विद्यार्थ्यांची सोय लक्षात ठेवल्याचे म्हटले आहे. यामध्ये इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपरीक्षा आयोजित करण्याची तारीखही लक्षात ठेवण्यात आली आहे. प्रवेश परीक्षांच्या खूप आधी परीक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना बोर्ड आणि प्रवेश दोन्ही परीक्षांसाठी वेळेचे व्यवस्थापन करण्यात मदत होईल. वेळापत्रक प्रसिद्ध करताना विद्यार्थ्यांच्या दोन विषयांच्या परीक्षा एकाच तारखेला होऊ नयेत, याचीही काळजी घेण्यात आल्याचे मंडळाने म्हटले आहे. सकाळी १०.३० वाजल्यापासून परीक्षा सुरू होतील. शाळांनी वेळेवर एलओसी सादर केल्यामुळे हे शक्य झाले आहे.

यावेळी जाहीर झालेल्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले. ते अगोदर परीक्षेची तयारी करण्यास सक्षम असतील. यामुळे ते परीक्षेची चिंता दूर करू शकतील. तसेच तुम्ही परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करू शकाल. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांचे कुटुंब आणि शिक्षकही उन्हाळ्याच्या सुटीत टूरचे नियोजन करू शकणार आहेत.

७५ टक्के उपस्थिती बंधनकारक
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांची शाळेतील ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक आहे. बोर्डाने यापूर्वी सांगितले होते की, केवळ वैद्यकीय आणीबाणी, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणे आणि इतर गंभीर कारणांमुळे विद्यार्थ्यांना उपस्थितीत २५ टक्के सूट दिली जाईल. यासाठी विद्यार्थ्याला आवश्यक कागदपत्रे शाळेकडे जमा करावी लागणार आहेत.

१ जानेवारी २०२५ पासून प्रात्यक्षिक
हे लक्षात घ्या की सीबीएसई शाळा १ जानेवारी २०२५ पासून इयत्ता १०वी आणि १२ वी बोर्ड परीक्षा उमेदवारांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा आणि अंतर्गत मूल्यांकन सुरू करतील. सीबीएसई हिवाळी शाळांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत होत आहेत.

सीबीएसई १०वी वेळापत्रक २०२५

 

सीबीएसई  १२वी वेळापत्रक २०२५

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest