संग्रहित छायाचित्र
अनिकेत राजू साठे (वय २१) आणि आदित्य सतीश घमरे (वय २१, दोघे रा. गाडीतळ, येरवडा) अशी अटक करण्यात आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी सराईत आहेत. दोघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम यांना बातमीदारामार्फेत मिळाली
होती. त्यानुसार येरवडा गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या तपास पथकाने
येरवड्यातील गुंजन चित्रपटगृहाजवळ सापळा रचला. दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तूले, दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या
मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक वैभव मगदूम, दिंगबर चव्हाण, प्रवीण रजपूत, यास्मिन सय्यद, हरिष मोरे, अजय गायकवाड
यांनी ही कारवाई केली.