पीएमआरडीए लॉटरीची मुदत वाढूनदेखील लाभापासून वंचित

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण अंतर्गत उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पासाठी लॉटरी काढण्यात आली आहे. या प्रकल्पाला नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने मुदतवाद घेण्याची नामुष्की आली होती. त्यात आता मुदत संपण्यासाठी दहा दिवस बाकी असताना, विस्कळीत झाले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 22 Nov 2024
  • 03:52 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

संकेतस्थळाला तांत्रिक अडचण, नागरिकांना सिक्युरिटी प्रमाणपत्र नूतनीकरण न केल्याचा बसला फटका

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण अंतर्गत उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पासाठी लॉटरी काढण्यात आली आहे. या प्रकल्पाला नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने मुदतवाद घेण्याची नामुष्की आली होती. त्यात आता मुदत संपण्यासाठी दहा दिवस बाकी असताना, विस्कळीत झाले. संकेतस्थळाला सुरक्षितेसाठी असलेले प्रमाणपत्र पीएमआरडीएने नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, ते वेळेत न केल्याने गेल्या आठ दिवसापासून अर्ज भरण्यास अडचण येत होती.

पीएमआरडीएच्‍या पेठ क्रमांक १२ येथील ४ हजार ८८३ सदनिका आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील ७९२ सदनिकांचा सर्व सुविधांयुक्त असा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचा भव्य प्रकल्प साकारण्यात आला आहे. मात्र यामधील सदनिकांची विक्री न झाल्याने त्यापैकी अनेक घरी रिकामी होती. या शिल्लक असलेल्या एकूण १ हजार ३३७ सदनिकांसाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. नागरिकांचा फारसा प्रतिसाद न मिळाल्‍याने तसेच अधिकाधिक नागरिकांची मुदत वाढीची मागणी पाहून आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी ३० नोव्‍हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर संकेतस्थळाला नोंदणी करणारे तसेच, अनामत रक्कम भरण्याची संख्या देखील वाढली. 

दरम्यान, गेल्या आठवड्यातील शुक्रवारपासून संकेतस्थळाला एरर येत असल्याने अखेर अनेकांनी अर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले. शुक्रवारी प्रमाणपत्र अपडेट नसल्याने संबंधित संकेतस्थळ बंद करण्यात आले होते. सिक्युअर सॉकेट सर्टिफिकेट याची मुदत संपली होती. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून ते नूतनीकरणासंदर्भात प्राधिकरणाकडे संबंधित विभागला कळवण्यात आले होते. एलआयसी ( नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर) यांच्याकडून त्याबाबत सूचना केली जाते. त्यानंतर ते नुकतेच प्रमाणपत्र नूतनीकरण केल्यानंतर संकेतस्थळ सुरू झाले. यानंतर नागरिकांसाठी ते संकेतस्थळ विनाअडथळा वापरण्यात सुरुवात झाली. याबाबत जमीन व मालमत्ता विभागाचे उपयुक्त हिम्मतराव खराडे यांनी संकेतस्थळ सुरू असल्याचे सांगितले. कोणतीही अडचण आल्यास हेल्पलाइनला संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

दोन दिवसांपूर्वी लॉटरीचा अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावरती गेलो. मात्र, तांत्रिक कारणाभावी अर्ज पुढे जाऊ शकला नाही. त्यानंतर पुन्हा दोन वेळा संकेतस्थ बंद करून सुरू केलं. मात्र, ते कार्यान्वित झाले नाही.  

- सुरेश गायकवाड, अर्जदार

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest