श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षिस वितरण
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धा 2024 चा बक्षिस वितरण रविवारी पार पडला. या स्पर्धेत तब्बल ८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत स्वराज्य दौलत दुर्गानाथ प्रतिष्ठान साकारलेल्या पुरंदर घेरा हा देखावा सर्वोत्कृष्ट ठरला.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्यावतीने राज्य स्तरीय ऑनलाईन किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात पार पडला. ज्येष्ठ इतिहास संशोधक व दुर्ग अभ्यासक पांडूरंग बलकवडे आणि एच व्ही देसाई कॉलेजचे विभाग प्रमुख गणेश राऊत हे प्रमुख म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी पहिल्या क्रमांकाला ९ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजारांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. त्यात मुंबई विभागात आयुष पाटील हे प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले. यांनी त्यांनी सुवर्णदुर्ग साकारला होता. तर द्वितीय क्रमांक ओमकार मित्र मंडळ - सरस भेड दुर्ग देखाव्याला मिळाले. तर तृतीय क्रमांक घरकूल मित्र मंडळ यांनी साकारलेल्या प्रतापगड दुर्गाला मिळाले.
कोकण विभागात आदर्श मित्र मंडळाने साकारलेल्या वेल्बोर - साजरा - भोजर यांना प्रथम क्रमांक, तर द्वितीय क्रमांक किल्ले रायगड साकारलेल्या अष्टप्रधान मंडळाला मिळाले.
पश्चिम महाराष्ट्र विभागातून प्रथम क्रमांक सांगलीच्या स्वराज्य दौलत दुर्गनाथ प्रतिष्ठानने साकारलेल्या पुरंदर वज्रगड पुरंदर घेरा पुरंदरच्या देख्याव्याला तर सिंहगड हलता देखावा करणाऱ्या पुण्याच्या मिरजकर परिवाराला द्वितीय आणि किल्ले अहिवंतगड आणि किल्ले मार्कड्याचा देखावा करणाऱ्या सांगलीच्या विजेता तरुण मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला.
पुरंदर घेरा ठरला सर्वोत्कृष्ट किल्ला
स्वराज्य दौलत दुर्गानाथ प्रतिष्ठान साकारलेल्या पुरंदर घेरा यांनी 11 किल्ले एकत्र एकूण जो देखावा सादर केलेला देखावा सर्वोत्कृष्ट ठरला. त्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस होते. तर वेद इनामदार या लहान मुलाने साकारलेल्या मल्हारगडला आणि महिलांनी साकारलेल्या स्वयंभू गर्जनाच्या- रायगडच्या देखाव्याला उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे उत्तेजनार्थ बक्षिसाचे स्वरूप होते.