वाहनचालकांवरील थकीत दंडासाठी “हेल्पडेस्क”, पहिल्या दोन दिवसात ३३५ खटले निकाली

पोलीसांनी सुरू केलेल्या हेल्पडेस्कच्या माध्यमातून २८ आणि २९ ऑगस्ट या दोन दिवसात एकूण ३३५ वाहनचालकांनी उपस्थित राहून त्यांच्या वाहनांवरील प्रलंबित असलेले वाहतूक चलनांचे रक्कमेत तडजोड केलेली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 30 Aug 2023
  • 12:39 pm
Helpdesk : वाहनचालकांवरील थकीत दंडासाठी “हेल्पडेस्क”, पहिल्या दोन दिवसात ३३५ खटले निकाली

पहिल्या दोन दिवसात ३३५ खटले निकाली

वाहनचालकांनी “हेल्पडेस्क” ला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा – वाहतूक पोलीस

वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंड प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांसाठी मदत केंद्र येरवडा येथे सोमवारपासून (२८ ऑगस्ट) सुरू करण्यात आले आहे. पोलीसांनी सुरू केलेल्या हेल्पडेस्कच्या माध्यमातून २८ आणि २९ ऑगस्ट या दोन दिवसात एकूण ३३५ वाहनचालकांनी उपस्थित राहून त्यांच्या वाहनांवरील प्रलंबित असलेले वाहतूक चलनांचे रक्कमेत तडजोड केलेली आहे.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ९ सप्टेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. लोकअदालतीत प्रलंबित खटले तडजोडीने मार्गी लावण्यात येतात. वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंडाचे प्रमाण मोठे आहे. थकीत दंडाची रक्कम कमी करणे, तसेच वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेकडून वाहनचालकांसाठी मदत केंद्र सुरू (हेल्प डेस्क) सुरू करण्यात आले आहे.

या “हेल्पडेस्क” अंतर्गत नागरिकांना वाहतूक नियमांचे भंग केलेल्या चलनाबाबत मार्गदर्शन करण्यात येत असून या हेल्पडेस्क करीता वाहनचालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असून वाहतूक नियमांचा भंग केल्याचे स्विकार करुन दंडाची तडजोड रक्कमेत तडजोड केली आहे. याप्रमाणे वाहनचालकांनी आपले वाहनांवरील प्रलंबित केसेसच्या निर्गतीचे अनुषंगाने उपस्थित राहिल्यास वाहन चालकांवरील प्रलंबित खटल्यांची रक्कमेत तडजोड व निर्गती होण्यास मदत होईल. तरी ज्या वाहनचालकांचे वाहनांवर वाहतूक चलान प्रलंबित असतील अशा वाहनचालकांनी “हेल्पडेस्क” ला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन वाहतूक शाखा, पुणे शहर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांचेकडून करण्यात येत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest