पुण्यात एनडीआरएफसाठी बनवण्यात आली हॅझार्डस मटेरियल व्हेईकल
जगातील अनेक शोध हे लष्कराच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना लागलेत. भारत सरकरच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीकडून पुण्यातील कारखान्यात याच प्रयत्नांतून एक हॅझार्डस मटेरियल व्हेईकल तयार करण्यात आली आहे. कोणत्याही जैविक हल्ल्याला, रासायनिक हल्ल्याला आणि आण्विक हल्ल्याला तोंड देण्याची या गाडीची क्षमता आहे.
एखाद्या परिसरात बायोलॉजिकल, केमिकल किंवा न्यूक्लिअर अटॅक झाला तर ही व्हेईकल त्या परिस्थितीत काम करु शकणार आहे. हल्ला नक्की कोणत्या स्वरुपाचा आहे, त्याची तीव्रता किती आहे हे या व्हेईकलच्या वरती बसवलेल्या एंटीनांच्या सहाय्याने तपासता येणार आहे. हे हल्ले परतवून लावण्याची यंत्रणा या व्हेईकलमधे असणार आहे.
सहा व्यक्ती सुरक्षाकवच असलेल्या या व्हेईकलमध्ये काम करु शकणार आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्सने एनडीआरएफसाठी ही गाडी तयार केली असून या गडाची किंमत १५ कोटी रुपये आहे. आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफ या गाडीचा उपयोग करु शकणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.