पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक
DRDO संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे प्रमुख असनारे प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानला काही गोपनीय माहिती दिली असल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले आहे. बालगंधर्व येथील झाशीची राणी पुतळ्या समोर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
प्रदीप कुरुलकर यांनी आयएसआयला आजपर्यंत काय माहिती दिली आहे. याचा तपास करा व देशद्रोही कुरुलकरला फासावर लटकवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखीली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना जगताप म्हणाले की, “विरोधी पक्षातील एखाद्या नेत्याने विधान केल्यावर सत्ताधारी भाजपाकडून त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते. पण मागील ४० वर्षांपासून डीआरडीओ या संस्थेवर विविध पदांवर शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांनी काम पाहिले आहे. पण आता याच व्यक्तीने पाकिस्तानला माहिती पुरविल्याचे समोर आले आहे.”
“प्रदीप कुरुलकर यांनी आरएसएसमध्ये देखील विविध पदांवर काम केले आहे. त्यामुळे नेहमी इतरांना देश प्रेमाबद्दल आरएसएसकडून सांगितले जाते, पण याच शाखेतील व्यक्तीने देशातील माहिती पाकिस्तानला पुरविली. त्यामुळे आरएसएसमध्ये हेच शिकवले जाते का? त्यामुळे आम्हाला देश प्रेम आरएसएस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी शिकवू नये. आमच्या रक्तात देश प्रेम असून देशद्रोही प्रदीप कुरुलकर यांच्यावर कठोर कारवाई केंद्र सरकारने कारवाई”, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.