Pune Metro : आजपासून पुणे मेट्रोचे ‘एक पुणे विद्यार्थी पास’, पहिल्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत

मेट्रोने ‘एक पुणे विद्यार्थी पास’ प्रीपेड कार्डची सुविधा आजपासून (शुक्रवार) सुरू केली आहे. विद्यार्थी पासची ही सेवा १३ वर्षे वयोगटाच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी असणार असून, त्यांना तिकीटदरात ३० टक्के सवलत दिली जाणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 6 Oct 2023
  • 11:40 am
Pune Metro : आजपासून पुणे मेट्रोचे ‘एक पुणे विद्यार्थी पास’, पहिल्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत

आजपासून पुणे मेट्रोचे ‘एक पुणे विद्यार्थी पास’, पहिल्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत

पुणे मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना पुणे मेट्रोतून दैनिक प्रवास सुखकर व माफक दरात करता यावा याउद्देशाने मेट्रोने ‘एक पुणे विद्यार्थी पास’ प्रीपेड कार्डची सुविधा आजपासून (शुक्रवार) सुरू केली आहे. विद्यार्थी पासची ही सेवा १३ वर्षे वयोगटाच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी असणार असून, त्यांना तिकीटदरात ३० टक्के सवलत दिली जाणार आहे.

आजपासून सुरु करण्यात आलेल्या एक पुणे विद्यार्थी पास’ सर्व मेट्रो स्थानकांवर दुपारी १ वाजल्यापासून उपलब्ध असेल. यामध्ये पहिल्या १० हजार विद्यार्थ्यांना विद्यार्थी पास कार्ड मोफत दिले जाणार आहे. त्यानंतर कार्डची किंमत १५० रुपये आणि वार्षिक शुल्क ७५ रुपये असे असेल. एक पुणे विद्यार्थी पास कार्ड’ घेण्यासाठी १३ वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे. त्याखालील वय असणारे विद्यार्थी हे कार्ड घेऊ शकत नाहीत.

१३ ते १८ वर्षे वय असणारे विद्यार्थी पॅन कार्ड नसल्यास एक ई-फॉर्म भरून हे कार्ड मिळवू शकतात. हे कार्ड घेण्यासाठी महाविद्यालयाचे अधिकृत ओळखपत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाइड प्रमाणपत्र आवश्यक असेल. हे कार्ड घेणाऱ्या प्रत्येक विद्यर्थ्याला तिकीटदरात ३० टक्के सवलत मिळणार आहे. या कार्डची वैधता तीन वर्षे असून, हे कार्ड अहस्तांतरणीय आहे. प्रवासी पुणे मेट्रोच्या संकेतस्थळावर उपलब्ध ई-फॉर्म भरून विद्यार्थी पास मिळवू शकतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest