पुणे: पोलिसांतला माणूस जागा आहे म्हणून उत्सव निर्विघ्न; मनोज पाटील यांचे प्रतिपादन

पोलीस नावाचा खाकी वर्दीतला ‘माणूस’ जागा आहे म्हणून कोणताही सण, उत्सव निर्विघ्न पार पडतो, असे मत पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी व्यक्त केले. जनहितम् संघटना आणि अखिल बिबवेवाडी वारकरी सेवा मंडळाकडून स्वारगेट पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस मदत कक्ष उभारले असून त्याच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 21 Sep 2024
  • 03:32 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पोलीस नावाचा खाकी वर्दीतला ‘माणूस’ जागा आहे म्हणून कोणताही सण, उत्सव निर्विघ्न पार पडतो, असे मत पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील (Manoj Patil) यांनी व्यक्त केले. जनहितम् संघटना आणि अखिल बिबवेवाडी वारकरी सेवा मंडळाकडून स्वारगेट पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस मदत कक्ष उभारले असून त्याच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

यावेळी परिमंडल दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप फूलपगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता देवकाते, संस्थेचे अध्यक्ष रामविलास माहेश्वरी, नितीन शितोळे सरकार, नितीन चोरडिया, मनोज पटवर्धन, राजेश चाहर, राजूशेठ चोपडा, सूरज माहेश्वरी आदी उपस्थित होते. 

मनोज पाटील म्हणाले, पोलिसांना कर्तव्य बजावताना वैयक्तिक सुखाचा त्याग करावा लागतो. नागरिकांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेला अग्रक्रम द्यावा लागतो. केवळ नोकरी म्हणून नव्हे तर कर्तव्यनिष्ठेमधून पोलीस काम करीत असतात. ३० तासांपेक्षा अधिक काळ बंदोबस्तासाठी खडे उभे राहणारे पोलीस आपल्याच समाजाचा महत्त्वाचा घटक आहेत. ते आपल्यातीलच आहेत. या ‘आपल्या’ खाकी वर्दीतल्या माणसांसाठी जेवण, आराम आणि वैद्यकीय सुविधा देणाऱ्या संस्था पुढे येतात. त्यांच्याकडून होणारे काम हीदेखील एकप्रकारची सेवाच आहे.

यावेळी रामविलास माहेश्वरी म्हणाले, गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना ३० तासांपेक्षा अधिक काळ बंदोबस्त करावा लागतो. त्यांच्या जेवणाचे हाल होतात. अनेकांना आरोग्याच्या तक्रारी असतात. त्यांच्यासाठी औषधांची उपलब्धता आणि वेळीच वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक असते. या सर्वांचा विचार करून मागील १८ वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत.

पोलिसांसाठी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत फूड पॅकेट, पाणी, नाश्ता, यासह वैद्यकीय तपासणी, औषधोपचार यांची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता देवकाते यांनी केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest