ड्रॉवरमध्ये पैशाचे बंडल सापडूनही कारवाई नाहीच

पुणे महापालिकेच्या पथ विभागातील एका उपअभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये पाचशे रुपयांचे बंडल एका ठेकेदाराकडून ठेवण्यात आले होते. ही बाब आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांनी उघड केली होती.

संग्रहित छायाचित्र

तोंडदेखली चौकशी समिती; माजी आयुक्तांनी पुणेकरांची केली दिशाभूल

पुणे महापालिकेच्या पथ विभागातील एका उपअभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये पाचशे रुपयांचे बंडल एका ठेकेदाराकडून ठेवण्यात आले होते. ही बाब आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांनी उघड केली होती. या प्रकरणानंतर महापालिकेत चांगलीच चर्चा रंगली होती. उपअभियंत्यावर कडक कारवाई केली जाईल असे बोलले जात होते. मात्र पथ विभागापासून ते माजी आयुक्तांपर्यंत या अभियंत्याला एकप्रकारे संरक्षणच दिल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी अधिक्षक अभियंत्यांची चौकशी समिती नेमण्यात आल्याचे सांगण्यात आले होते, मात्र या समितीला लेखी आदेशच देण्यात आले नाहीत. त्यामुळे संबंधित उपअभियंत्याची चौकशी झालीच नसल्याचे समोर आले असून माजी आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी पुणेकरांची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या पथ विभागात ठेकेदारांकडून संबंधित अधिकाऱ्यांनी पैसे दिल्याची चर्चा होती. त्यात एका उपअधियंत्याच्या टेबलमध्ये पाचशे रुपयांचे बंडल ठेवण्यात आले होते. त्याचा व्हीडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान पाचशे रुपयांचे बंडल नेमके कोणी नेले याचा पत्ता कोणालाच अद्याप लागलेला नाही. महाापालिकेचे अधिकारी म्हणतात की हे पैसे आपच्या कार्यकर्त्ंयांनी नेले. आपचे कार्यकर्ते म्हणतात की, उपअभियंताच हे पैसे घेऊन गेला आहे. पैसे नेमके कोणी नेले याची माहिती समोर आलेली नाही. तसेच उपअभियंत्याची देखील चौकशी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

आपचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष रविराज काळे (Raviraj Kale) महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरील पथ विभागात त्यांनी दिलेल्या तक्रारीचे पुढे काय झाले हे विचारण्यासाठी पथ विभागात आले होते. त्यावेळी अभियंता बैठकीत असून बाहेर उभे राहण्यास सांगितले. त्या दरम्यान अभियंत्याच्या केबिन मधून एकजण पिवळी पिशवी बाहेर घेवून आला. त्याने थेट उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये एक पाकिट ठेवले. त्यावेळी उपअभियंत्याने त्याला ‘अरे येथे कुठे ठेवतो,’ असे बोलून त्याला हटकले. मात्र ‘राहू द्या, काही होत नाही,’ असे सांगून पाकिट ड्रॉवरमध्ये ठेवून ती व्यक्ती निघून गेली.  त्यानंतर या गोष्टींचा संशय आल्याने आम्ही थेट मोबाईलच्या माध्यमातून व्हीडीओ काढण्यास सुरवात केला, आणि उपअभियंत्याला ते पाकिट बाहेर काढण्यास सांगितले. त्यानंतर हा प्रकार समोर आला, अशी माहिती आपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी ‘सीविक मिरर’ला  दिली होती.

काळे यांना संशय आल्यानंतर त्यांना उपअभियंत्याकडे चौकशी करून त्याला ड्रॉवर उघडण्यास भाग सांगितले. त्यानंतर त्या उपअभित्यांने ड्ऱॉवर उघडण्यास नकार दिला. परंतु काळे यांनी त्याला ड्ऱॉवर उघडण्यास भाग पाडले. ड्रॉवरमध्ये एक बंद पाकिट आढळून आले. त्यामध्ये काय आहे, असे विचारले असता, याची कोणतीही माहिती नसल्याचे त्याने सांगितले. पाकिट उघडण्यास सांगितले असता, त्याने ते उघडण्यास नकार दिला. त्यानंतर मात्र काळे यांनीच ते पाकिट उघडले तर त्यामध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल आढळले. ही रक्कम कुठून आली, असे त्यांनी विचारले. त्यावर ‘‘ठेकेदार रक्कम ठेवून गेला, पैसे माझे नाहीत,’’ असा दावा उपअभियंत्याने केला. यावर काळे यांनी, ‘पण तुम्ही पैसे कसे काय ठेवून घेतले,’ असे विचारल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे काळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. हा प्रकार घडल्यानंतर काळे तक्रार करण्यासाठी अधिक्षक अभियंता अमर शिंदे यांच्याकडे जात असतानाच उपअभियंता रोख रकमेसह टेबल जवळून गायब झाला. असे काळे यांचे म्हणणे आहे.

लेखी आदेश नाही, चौकशीही नाही

 उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये पाचशे रुपयांचे बंडल सापडल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी माजी विक्रम कुमार यांनी समिती नेमल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर या समितीने सात दिवसांमध्ये अहवाल सादर केला आहे. त्याचा अभ्यास करुन योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र समितीमध्ये नेमलेल्या अधिक्षक अभियंत्यांना कोणताही लेखी आदेश देण्यात आले नव्हते. त्यामुळे कोणत्या आधारावर त्या उपअभियंत्याची चौकशी केली जाणार, असा प्रश्न या समितीला पडला आहे. त्यामुळे लेखी आदेश नाही, त्यामुळे चौकशीही नाही. अशी भूमिका संबंधित अधिक्षक अभियंत्याना घ्यावी, लागल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest