Hotel Pride : हॉटेल प्राईडमधील स्विमिंग टॅंकमध्ये बुडून मृत्यू; सहा महिन्यांनी उघड झाली घटना

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या तपासामध्ये हॉटेल प्रशासन आणि लाईफ गार्ड म्हणून काम करत असलेल्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 11 Oct 2023
  • 11:09 am
Hotel Pride : हॉटेल प्राईडमधील स्विमिंग टॅंकमध्ये बुडून मृत्यू; सहा महिन्यांनी उघड झाली घटना

हॉटेल प्राईडमधील स्विमिंग टॅंकमध्ये बुडून मृत्यू; सहा महिन्यांनी उघड झाली घटना

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : कलकत्ता येथील प्रसिद्ध प्राध्यापकाचा शिवाजीनगरच्या हॉटेल प्राइडमध्ये असलेल्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सहा महिन्यांनी उघडकीस आली आहे. ही घटना २ एप्रिल २०२३ रोजी घडली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या तपासामध्ये हॉटेल प्रशासन आणि लाईफ गार्ड म्हणून काम करत असलेल्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मोहित अगरवाल (वय ३५) असे मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय दंड विधान ३०४ (अ) नुसार हॉटेल प्राईड शिवाजीनगर पुणे यांचे प्रशासन आणि लाइफ गार्ड संजय राजाराम साळवी (वय ३५, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अमन संतोष मनका (वय ३४, रा. पीटी कोर्टयार्ड सोसायटी, खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित अगरवाल हे मूळचे कलकत्ता येथील राहणारे होते. पुण्यामध्ये ते येऊन जाऊन काम करीत होते. तर फिर्यादी अमन हे यांच्या मामाचा तो मुलगा होता. पुण्यातील 'सीए' अभ्यासक्रमासंदर्भातील क्लासेसमध्ये ते गेस्ट लेक्चरर म्हणून काम करायचे.

घटनेच्या दिवशी देखील ते पुण्यामध्ये लेक्चर घेण्यासाठी आलेले होते. ते हॉटेल प्राइडच्याच रूम मध्ये राहिलेले होते. सकाळी पोहण्यासाठी ते हॉटेलच्या स्विमिंग टॅंकमध्ये गेले. काही वेळाने ते पाण्यात बुडायला लागले. जीक वाचवण्यासाठी हातपाय त्यांनी हातपाय मारायला सुरुवात केली. वास्तविक त्या ठिकाणी स्विमिंग पूलचा लाईफ गार्ड किंवा अटेंडंट असणे आवश्यक होते. मात्र, त्या ठिकाणी कोणीही हजर नव्हते. लाईफ गार्ड संजय साळवी याने थोड्या वेळाने येऊन मोहित यांना पाण्यात न उतरताच हाताला धरून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आले. ससून हॉस्पिटलमध्ये मोहित यांना तपासणीपूर्वी मृत घोषित करण्यात आले. या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या चौकशीमध्ये हॉटेल प्रशासन आणि लाइफ गार्डचा हलगर्जीपणा दिसून आला. मोहित यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest