महापालिकाच देतीये रोगांना आमंत्रण ? जमिनीवरील पाणी साठवण टाकीत डासांची उत्पती

भागात डेंगूचे रुग्ण आढळले असून पाणीपुरवठा खात्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महापालिकाचा रोगांना आमंत्रण देत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर त्वरित कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन नवनिर्माण सेनेच्या वतीने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे यांना देण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 30 Aug 2023
  • 03:11 pm
water storage tanks : महापालिकाच देतीये रोगांना आमंत्रण ? जमिनीवरील पाणी साठवण टाकीत डासांची उत्पती

जमिनीवरील पाणी साठवण टाकीत डासांची उत्पती

नवनिर्माण सेनेकडून संबंधितांवर कारवाईची मागणी

पुण्यातील येरवडा येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्डमधील मनपाच्या पाणीपुरवठा केंद्रात गेल्या दीड वर्ष वापरात नसलेल्या जमिनीवरील पाणी साठवण टाकीत पावसाचे पाणी साठून डासांचा फैलाव वाढला आहे. या भागात डेंगूचे रुग्ण आढळले असून पाणीपुरवठा खात्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महापालिकाचा रोगांना आमंत्रण देत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर त्वरित कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन नवनिर्माण सेनेच्या वतीने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे यांना देण्यात आले आहे.

यावेळी मनसे शहर सचिव रमेश जाधव व उपविभाग अध्यक्ष मनोज ठोकळष उपशहराध्यक्ष हेमंत बत्ते, विभाग सचिव श्रीनिवास दिसले, उपविभाग अध्यक्ष जेमा चव्हाण आदी उपस्थित होते. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, लष्कर व होळकर या जलशुध्दीकरण प्रकल्पातून महाराष्ट्र हौसिंग येरवडा येथील पंपिग स्टेशनमधील बांधण्यात आलेल्या जमिनीवरील पाणी साठवण टाकीतून या भागास पाणी पुरवठा होत होता. त्या टाकीत पाणी साठवण बंद करून दीड दोन वर्षांपासून भामा आसखेड प्रकल्पातून उभारण्यात आलेल्या उंचीवरील पाण्याच्या टाकीतून सदर भागात पाणी पाणीपुरवठा करण्यात येतो.

येथील पाणीपुरवठा पंपिग स्टेशनमधील जमिनीवरील बंद असलेल्या पाणी साठवण टाकीवरील झाकण तुटल्याने पावसाचे पाणी साचले आहेत. तसेच सदर भागात ठिकठिकाणी दलदल आहे. त्यात पाणी साठून डासांचा फैलाव होत आहे. या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. तसेच ठिकठिकाणी गवत उगवले आहेत, सापांचा सुळसुळाट झाला आहे, पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे रुग्णांना अतिसार, उलट्या, मलेरिया, डेंगू या साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

साथीच्या रोगाच्या काळात नागरिकांच्या घरी एखादा भांड्यात पाणी आढळले तरी मनपा प्रशासन कारवाई करतात. मात्र एवढ्या मोठ्या टाकीत पाणी साठले तरी त्याकडे दुर्लक्ष करून महापालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. सदर टाकीतून पाण्याचा उपसा करून सदर टाकी बंद करावी. तसेच या भागची साफसफाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही केली गेली नाही तर मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest