शंभर वाहनांचे धानोरीत नुकसान; अनेक सोसायट्यांतील पार्किंग उद्ध्वस्त

धानोरीत मंगळवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे प्रचंड पूर येऊन तब्बल १०० वाहनांचे नुकसान झाले आहे. येथील अनेक सोसायट्यांतील पार्किंग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. बिल्डरांनी बांधकाम करताना काळजी घेतली नाही. त्यामुळेच नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

संग्रहित छायाचित्र

धानोरीत मंगळवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे प्रचंड पूर येऊन तब्बल १०० वाहनांचे नुकसान झाले आहे. येथील अनेक सोसायट्यांतील पार्किंग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. बिल्डरांनी बांधकाम करताना काळजी घेतली नाही. त्यामुळेच नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पार्किंगमध्ये उभी केलेली सुमारे १०० ते १२० वाहने पाण्याखाली गेल्याने त्यांचे नुकसान झाले. अगदी नव्या कारही पाण्यात बुडाल्याने निकामी झाल्या. खराडी परिसरातही पाणी शिरल्याने घरातील सामानाची नासाडी होऊन  रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुणे महानगरपालिका (पीएमसी) आपत्ती व्यवस्थापनाला मदतीसाठी सुमारे १०० हून अधिक फोन आले. त्यांना प्रतिसाद देताना महापालिकेच्या नाकीनऊ येत होते.  भिंती कोसळल्या 

बावधनमधील रहिवासी मनीष देव यांनी ’सीविक मिरर‘ला सांगितले की, रस्त्यावर  लोखंडी आणि सिमेंट चेंबर असतात. महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच ते दोन्ही साफ करणे अपेक्षित आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. दिखावा म्हणून केवळ रस्ते साफ केले जातात.

कोरेगाव पार्कमधील रहिवासी रोहन देसाई म्हणाले की, फक्त एका दिवसाच्या पावसात ही  परिस्थिती झाली आहे. मोठ्या आकाराच्या जलवाहिन्या टाकण्याची सूचना आम्ही महापालिकेला अनेक दिवसांपासून करत आहोत. कोरेगाव पार्कमधील ५ नंबर लेनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. टिळक रोड ते कल्याणीनगरपर्यंतचा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. असाच मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास पुढील दोन महिने नागरिकांना प्रचंड त्रास होऊ शकतो.

खराडी येथील रहिवासी सीमा तन्वर म्हणाल्या,  खराडीमध्ये पाणी साचण्यासाठी जास्त पावसाची गरज नाही, अगदी थोड्या पावसातही रस्ते पाण्याने भरून जातात.  विशेषत: ढोले पाटील रस्त्यावर अशी स्थिती होऊ शकते. ड्रेनेजची साफसफाई होत नसल्याने पाण्याला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. सोसायट्यांमध्ये बॅकफ्लो होत असल्याने सांडपाणी आणि पावसाचे पाणी पुढे जाऊ शकत नाही. खराडीमध्ये प्रत्येक रस्त्यावर काम सुरू आहे. पाऊस सुरू झाल्यावर पाणी साचण्याचे प्रकार वाढले आहेत. 

कल्याणीनगर येथील रहिवासी मोनिका शर्मा म्हणाल्या, या भागात पाणी साचण्याच्या अनेक समस्या आहेत, आम्हाला वाटले की आम्ही तयार आहोत. पूर फार भयानक होता. विमानतळ पुलाजवळ निर्माण होणाऱ्या समस्यांविरोधात आम्ही अनेक तक्रारी केल्या आहेत. महापालिकेने या भागात मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाकावी, यासाठी सातत्याने मागणी करत आहोत.

पीएमसी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले,  मुसळधार पावसानंतर दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. पावसामुळे झाडे पडणे, पाणी तुंबणे आणि ड्रेनेज तुटलेल्या समस्यांनंतर नियंत्रण कक्षाला त्या रात्री सुमारे १०० फोन आले. नैसर्गिक आपत्तीत मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करणार असून त्यांना भरपाईही दिली जाईल.

महापालिकेचे मुख्य अभियंता  श्रीनिवास बोनाला म्हणाले, पावसाळ्यात भुयारी मार्गांची साफसफाई होते की नाही हे पाहणे आवश्यक आहे. रामवाडी येथे पाणी साचल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest