खंडाळा बोगद्यामध्ये कंटेनर झाला पलटी, वाहतूक ठप्प

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील खंडाळा बोगद्यामध्ये कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 2 Aug 2023
  • 03:10 pm
खंडाळा बोगद्यामध्ये कंटेनर झाला पलटी, वाहतूक ठप्प

खंडाळा बोगद्यामध्ये कंटेनर झाला पलटी, वाहतूक ठप्प

मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गाने वळवली

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील खंडाळा बोगद्यामध्ये कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. तिन्ही लेनवर कंटेनर पलटी झाल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. हा अपघात आज (बुधवारी) सकाळी साडेअकरच्या सुमारास घडला आहे.

कंटेनर पलटी झाल्यामुळे महामार्ग पोलिसांनी मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणावळ्यातील वलवण येथून जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वळवली आहे. सध्या कंटेनर हटवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest