नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कोथरुडमधील मृत्यूंजय मंदिराची साफसफाई

पुणे: अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेकरिता काहीच दिवसांचा कालावधी बाकी आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर व पुजास्थळांची स्वच्छता करण्यात येत आहे.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कोथरुडमधील मृत्यूंजय मंदिराची साफसफाई

मनाच्या शुद्धीप्रमाणे पूजास्थळांची स्वच्छता आवश्यक असल्याचे आवाहन

पुणे: अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेकरिता काहीच दिवसांचा कालावधी बाकी आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर व पुजास्थळांची स्वच्छता करण्यात येत आहे. त्यानुसार नामदार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी कोथरुड (Kothrud) मधील मृत्यूंजय मंदिरात महादेवांचे दर्शन घेऊन परिसराची साफसफाई केली.  (pune news)

यावेळी भाजपा कोथरुड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, शहर उपाध्यक्ष शाम देशपांडे, कोथरुड मंडल सरचिटणीस गिरीश खत्री, प्रा. अनुराधा एडके, दीपक पवार, कोथरुड मतदारसंघ निवडणूक सह प्रभारी नवनाथ जाधव, गिरीश भेलके, पुणे शहर चिटणीस अमोल डांगे, नगरसेवक जयंत भावे, प्रभाग १३ च्या अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, अजित जगताप, सुजाता जगताप, सागर जोगवडे,कुणाल तोंडे, चेतन धाडवे, राजेंद्र येडे, राज तांबोळी, नंदकुमार गोसावी, प्रशांत हरसुले, विनोद मोहिते, रमेश चव्हाण, आशुतोष वंशंपायन, नितीन आपटे, पार्थ मठकरी, रोहन राऊत, विठ्ठल राव मिंडे, वैभव जमदाडे, संगीता शेवडे, सौरभ अथणीकर, व्यवस्थापक मृत्युंजय मंदिर नितीन शिंदे जयंत देशपांडे यांच्या सह इतर सहकारी उपस्थित होते. 

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या आगमनाने संपूर्ण देशात उत्साचे आणि चैतन्याचे वातावरण आहे. आपली श्रद्धास्थाने म्हणजे मठ आणि मंदिरे आपले मानबिंदू आहेत. आपण आपल्या मनाच्या शुद्धीसाठी देव दर्शन करतो. त्यामुळे मंदिर परिसराची स्वच्छताची ही देखील तितकीच पवित्र आहे. यामुळे माननीय मोदीजींनी याचेच महत्त्व ओळखून प्रभू श्रीरामांच्या आगमनाच्या अनुषंगाने मंदिर परिसर स्वच्छतेवर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आवाहनानुसार मकर संक्रांतीपासून ते २२ जानेवारी पर्यंत देशभरातील सर्व मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे. 

त्यानुसार नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड मधील मृत्यूंजय मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेऊन मंदिराची साफसफाई केली. मनाच्या शुद्धीप्रमाणे पूजास्थळांची स्वच्छता ही देखील पवित्र आहे. त्यामुळे आपण कोणत्याही धर्माचे, पंथाचे वा संप्रदायचे असाल; तरी देखील आपल्या पुजास्थळी जाऊन स्वच्छतेची अनुभूती आपण सर्वांनीच घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest