पुणे : थकबाकीमुळे जप्त केलेल्या शहरातील ८८ मालमत्तांचा लिलाव

महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाने थकबाकी असलेल्या ८८ मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये निवासी मालमत्तांसह व्यापारी व व्यावसायिकांच्या मालमत्तांचा समावेश आहे.

PMC News

पुणे : थकबाकीमुळे जप्त केलेल्या शहरातील ८८ मालमत्तांचा लिलाव

महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून कार्यवाही सुरू, ५ ऑगस्ट रोजी होणार लिलाव

महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाने थकबाकी असलेल्या ८८ मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये निवासी मालमत्तांसह व्यापारी व व्यावसायिकांच्या मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. या मालमत्तांचा ५ ऑगस्ट रोजी लिलाव होणार आहे.

महापालिकेला बांधकाम परवानगीतून मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे करसंकलन विभाग हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मागील पाच वर्षांपासून कोणतीही करवाढ न करता थकीत कर वसुलीवर भर दिला. विनानोंद मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्यांना करकक्षेत आणण्यात येत आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांनी दरवर्षी मिळकतकर भरणे आवश्यक आहे. मात्र, काही मालमत्ताधारक अनेक वर्षे मालमत्ता कर भरत नाही. त्यांची थकबाकी वाढली आहे. त्यांच्यापैकी काही मालमत्ताधारक  जप्तीच्या नोटिसा, कारवाईचा इशारा दिल्यानंतर कराचा भरणा करतात. मात्र, मालमत्ताधारकांनी नोटिसा दिल्यानंतरही कराचा भरणा केला नाही. त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाते. अशा मालमत्ताधारकांना गेल्या वर्षी नोटीस बजावल्या होत्या. त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे ८८ मिळकतींवर जप्तीची कारवाई केली.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील अनुसूची ‘ड’ मधील प्रकरण आठ (कराधान नियम) नियम ४२ ते ४८ मधील तरतुदींनुसार मालमत्तांची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी महापालिकेच्या करसंकलन विभाग, मुख्य कार्यालयात २ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आधारकार्ड, पॅन कार्डच्या प्रतींसह लेखी अर्जाद्वारे नोंदणी करायची आहे.

तसेच, लिलावातील मालमत्तांबाबत कोणत्याही व्यक्ती, संस्था व इतरांचे आर्थिक हितसंबंध, हरकती असल्यास योग्य त्या कागदपत्रांसह ३ ऑगस्टपूर्वी लेखी स्वरूपात नोंदवायचे आहेत. नंतर ५ ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत करसंकलन विभागाच्या साहाय्यक आयुक्त कार्यालयात लिलावप्रक्रिया पार पडणार आहे.  यामध्ये ५० हजार ते ३ लाख रुपयांपर्यंत मिळकतकर थकबाकी असलेल्या मिळकतींचा समावेश आहे. त्यांचे बाजारमूल्य किमान १९ लाखांपासून दीड कोटी रुपयांपर्यंत आहे.

वारंवार आवाहन करूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांच्या ८८ मालमत्ता महापालिकेने जप्त केल्या आहेत. या मालमत्तांचा ५ ऑगस्ट रोजी लिलाव होणार आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, सराफी व्यापाऱ्यांच्या बिगरनिवासीसह निवासी मालमत्तांचा समावेश आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest