PMC : होर्डिंग परवाना नुतनीकरणासाठी ९०० जणांचे अर्ज, सोमवारपासून होणार कारवाई

महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडे जाहिरात फलकांचा (होर्डिंग) परवाना नुतनीकरणासाठी सुमारे नऊशे जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे नुतनीकरणासाठी अर्ज प्रक्रिया न करणाऱ्या व अनधिकृत असणाऱ्या होर्डींगवर महापालिकेडून सोमवारपासून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

PMC : होर्डिंग परवाना नुतनीकरणासाठी ९०० जणांचे अर्ज, सोमवारपासून होणार कारवाई

संग्रहित छायाचित्र

महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडे जाहिरात फलकांचा (होर्डिंग) परवाना नुतनीकरणासाठी सुमारे नऊशे जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे नुतनीकरणासाठी अर्ज प्रक्रिया न करणाऱ्या व अनधिकृत असणाऱ्या होर्डींगवर महापालिकेडून सोमवारपासून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून जाहिरात फलक नियमन व नियंत्रण नियमानुसार जाहिरात फलकांसाठी नुकतेच शुल्क वाढ करण्यात आली आहे. महापालिकेची जुनी हद्द व 2017 नंतर समाविष्ट झालेल्या 34 गावांसह महापालिकेच्या नवीन हद्दीसाठी होर्डींग शुल्कवाढ करण्यात आली. दरम्यान, महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाने होर्डींगच्या दरवाढीनंतर आता अनधिकृत होर्डींगवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

परवाना व आकाशचिन्ह विभागाकडे एकूण एक हजार 900 होर्डींगची नोंदणी आहे. त्यापैकी आत्तापर्यंत सुमारे 900 होर्डींगसाठी परवाना नुतनीकरण करण्याबाबतचे अर्ज विभागाकडे दाखल झाले आहे. त्यानुसार, त्यांच्यासाठी पुढील प्रक्रिया होणार आहे. मात्र उर्वरीत 900 होर्डींगच्या नुतनीकरणासाठी अर्ज दखल झालेले नाहीत. त्यामुळे नुतनीकरणासाठी अर्ज दाखल न करणाऱ्या होर्डींग अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून सोमवारपासून कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

"आत्तापर्यंत आमच्याकडे होर्डींग परवाना नुतनीकरणासाठी 900 जणांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे उर्वरीत लोकांनी अर्ज केलेले नाहीत. त्यामुळे संबंधित होर्डींग अनधिकृत ठरणार असून त्यांच्यावर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे, असा इशारा महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest