दहावीचे बोगस प्रमाणपत्र विकणाऱ्याला अटक
बनावट साईटच्या माध्यमातून नोकरभरतीस जाणाऱ्या उमेदवारांना दहावीचे बनावट प्रमाणपत्र विकणाऱ्या टोळीचा पुणे पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथून एकाला अटक केली आहे. तर धाराशिव आणि अन्य ठिकाणांहून आणखी चार जणांना पुणे पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
मुख्य आरोपी इब्राहीम सय्यद (वय ३८) याला छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा गिरी, अल्ताफ शेख आणि सय्यद इमरान यांना ताब्या घेण्यात आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी इब्राहीमने बनावट विद्यापीठाच्या नावाने बनावट साईट तयार केली होती. याच माध्यमातून तो उमेदवारांना बनावट प्रमाणपत्र देत होता. या प्रमाणपत्रार जेवढी टक्केवारी वाढवाची आहे. तेवढे पैसे तो उमेदवाराकडून घ्यायचा.
याबाबत माहिती देताना गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले की, “आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये या सर्व प्रकरणात २७०० हून अधिक बोगस प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील पाच जिल्ह्यात या आरोपीने दिले आहेत. दहावी बारावीचे ७४१ प्रमाणपत्र तर ॲमेडस विद्यापीठ संभाजीनगर या विद्यापीठाच्या नावाने इतर कोर्सेसच्या प्रमाणपत्रांची संख्या ६०० हून अधिक आहे. यासोबतच इतर बनावट सर्टिफिकेट मिळून २७०० हून अधिक सर्टिफिकेट या आरोपीने तयार करून विकली आहेत.”
“प्रत्येक सर्टिफिकेटवर असणाऱ्या टक्केवारी प्रमाणे म्हणजेच ३५ टक्के असतील तर ३५०००, ४० टक्के असतील तर ४० हजार रुपये अशा पद्धतीने टक्क्यांप्रमाणे पैशांची मागणी या आरोपीकडून केली जात होती. अशा प्रकारची बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांवर आता पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे,” असेही झेंडे म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.