Keshavnagar : केशवनगरमधील दहशत रोखण्यासाठी आरोपींची काढली धिंड
पुण्यातील केशवनगर भागात १ मे रोजी ५० वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला होता. गैरकृत्य करताना विचारपूस केली याचा राग धरून काही टोळक्यांनी कोयत्याने वार करत या व्यक्तीची हत्या केली होती. याप्रकरणी तीन आरोपींनी पोलीसांनी अटक केली असून त्यांची केशवनगर परिसरामध्ये धिंड काढण्यात आली. शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून खून करण्याच्या प्रकार वाढल्यामुळे अशा टोळक्यांची दहशत मोडून काढण्यासाठी केशवनगर पोलिसांनी या आरोपींची धिंड काढली आहे.
नागनाथ पाटील, रोहित घाडगे आणि सनी चव्हाण अशी या खुनात अटक झालेला आरोपींची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी रवींद्र दिगंबर गायकवाड यांच्या घराबाहेर असणाऱ्या गोठ्यासमोर काही टवाळखोर मुले नशा होते. यावेळी त्यांनी या टोळक्यांना इथे नशा का करता? असा प्रश्न विचारला. तेव्हा ही मुले तेथून निघून गेली. मात्र काही वेळामध्ये हत्यारे घेऊन परत येत कोयत्याने गायकवाड यांच्यावर वार केले.
या घटनेनंतर संपूर्ण केशवनगर परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. केशवनगर भागातील नागरिकांनी या हत्येचा निषेध करत एक दिवस या भागातील सर्व दुकाने बंद ठेवली होती. याचप्रमाणे आता या आरोपींचा शोध घेतल्यानंतर यांच्या मुसक्या आवळण्यासाठी व दहशत रोखण्यासाठी केशवनगर परिसरामध्ये यांची दिंड काढण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.