दुर्लक्षित घटकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे ३१ वर्षांचे व्रत; जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात

आयुष्याच्या वळणावर एखादा वाईट प्रसंग आल्याने चेहऱ्यावर हास्य गमावून बसलेल्या व्यक्तीला आनंद देणे, एड्स रोगाने बाधित झाल्यामुळे समाजाने वाळीत टाकलेल्या व्यक्तीला मुख्य प्रवाहात समावून घेणे

John Paul Slum Development Project

दुर्लक्षित घटकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे ३१ वर्षांचे व्रत; जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात

पुणे : आयुष्याच्या वळणावर एखादा वाईट प्रसंग आल्याने चेहऱ्यावर हास्य गमावून बसलेल्या व्यक्तीला आनंद देणे, एड्स रोगाने बाधित झाल्यामुळे समाजाने वाळीत टाकलेल्या व्यक्तीला मुख्य प्रवाहात समावून घेणे, चुकीचा पाऊल पडल्याने अगर फसवणूक केल्याने तसेच आर्थिक परिस्थितीमुळे वारांगणाचे (वेश्या ) काम करणाऱ्या महिलेला आधार देणे, बेघर असलेल्यांना आसरा देवून जगण्याची नवी उमेद निर्माण करुन निरोगी आरोग्य देण्याचे व्रत घेवून निघालेल्या जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट संस्थेचा ३१ वर्धापन दिन शनिवारी उत्साहात पार पडला.(John Paul Slum Development Project)

जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट संस्थेची स्थापना १९९३ साली झाली होती. त्यानंतर या संस्थेने झोपडपट्टी भागातील नागरिकांपासून ते वारांगणा महिलांसाठी काम करुन त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचे काम केले आहे. शनिवारी या संस्थेचा वर्धापन उत्साहात पार पडला. या वेळी नागरी संरक्षण दलाच्या पुणे विभागाचे उपनियंत्रक अर्जुन कुऱ्हाडे, दत्ता यादव आदी उपस्थित होते. संस्थेचे संचालक जॉर्ज स्वामी,

अर्चना वाघमारे, बिमला मेरी, मिलींद पळसकर, धनश्री जगताप, कुंजलता बिचुलकर, श्रीनिवास चिलवेरी, डॉ. चेतन चव्हाण, डॉ. उदय पेटकर, व्यंकटेश्वर कुलकर्णी, दिनेश सिलम, रमजान बाळे, पुष्पा भगत ज्योरी यांच्यासह ५० कर्मचारी आणि १०० हून अधिक स्वयंम सेवकांकडून या संस्थेचे कामकाज चालविले जाते.  

या संस्थेकडून लाखो महिला, मुलांना आणि अनाथांना देण्याचे अविरत कार्य सुरु ठेवले आहे. समाजातील शेवटच्या घटका पर्यंत सेवा देण्याचे काम केले जाते. बुधवार पेठेतील वारांगणा (वेश्या) महिलांची आरोग्याची काळजी संस्थेच्या मार्फत घेतली जाते. शारिरीक संबंध ठेवताना कशी काळजी घ्यावी याचे प्रशिक्षणाचे काम केले जाते. तसेच एखाद्या पुरुषाकडून महिलेवर अन्याय अत्याचार झाल्यास तिला न्याय मिळवून देण्याचे काम देखील या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. समलिंगी पुरुषांसाठी (एमएसएम) देखील काम केले जाते. तसेच शहरातील विविध भागात आरोग्य जनजागृती शिबीरांचे आयोजन केले जाते. असे आर्चना वाघमारे यांनी सांगितले.

संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविले जातात. या प्रकल्पांसाठी केंद्र सरकार आणि पुणे महापालिकेचे सहकार्य मिळेत. गेल्या ३१ वर्षांच्या प्रवासात अनेकांच्या डोळ्यांतले आश्रू पुसण्याचे भाग्य मिळाले आहे. संस्थेचे संस्थापक जॉन पॉल तसचे माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे काम केले जाते. वारांगणांची मुले, अनाथ मुले, तसेच बेघरांना आसारा देण्यासाठी घरटं हा प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून राबिवला जातो. तसेच त्यांना शिक्षण दिले जाते. त्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जाते. तसेच त्यांच्यासाठी संस्कार वर्ग राबिवले जातात, यातून ते देशाचे चांगले नागरिक तयार व्हावेत, असा उद्देश असतो. केंद्र सरकारच्या सहकार्यातून संपूर्ण सुरक्षा केंद्राच्या माध्यमातून गंभीर रोग झालेल्या व्यक्तींची काळजी घेणे, त्यांना वेळेवर उपचार मिळवून देणे, तसेच असे रोग होऊ नयेत, यासाठी जनजागृती करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जाते. संस्थेत काम करणारे कर्मचारी हे पदवी धारक असून ते सामाजिक कार्य म्हणून प्रामाणिकपणे काम करत आहेत.

 - जॉर्ज स्वामी, संचालक- जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट.

एखाद्या व्यक्तीला कोणत्याही गंभीर रोगाची लागण झाली तर त्याच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या दु:खात भर पडते. मात्र त्याला जर आधार दिला त्याला होणारा अर्धा त्रास कमी होतो, असे बोलले जाते. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ही एक संस्था आहे. या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून बाधितांना आणि बेघरांना आधार देण्याचे काम केले जाते. याचा आदर्श घेवून समाजात प्रत्येकाने असे चांगले काम करण्याची काळाची गरज आहे.

  -  अर्जुन कुऱ्हाडे, उपनियंत्रक नागरी संरक्षण दल, पुणे विभाग.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest