Pune News : ब्रम्हा सन सिटीमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात 6 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

वडगाव शेरी येथील ब्रम्हा सन सिटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By saheer shaikh
  • Tue, 31 Oct 2023
  • 09:44 pm
Pune News : ब्रम्हा सन सिटीमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात 6 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

ब्रम्हा सन सिटीमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात 6 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

पुणे : वडगाव शेरी (Wadgaon Sherry) येथील ब्रम्हा सन सिटी (Bramha Sun City) को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. (Pune News) मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या (PMC News) सुमारास हा प्रकार घडला. सोसायटीच्या आवारात खेळत असताना कुत्र्यांनी अचानक हल्ला केला.

सोसायटीच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्यांच्या हल्ल्यातून सुटका करून घेण्यासाठी हा मुलगा पळाला. मात्र, त्याच्या पायाला कुत्र्यांनी चावे घेतले. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  सोसायटीतील भटक्या कुत्र्यांनी बालकावर हल्ला केल्याची गेल्या पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना असल्याचे सोसायटी सदस्यांचे म्हणणे आहे.

ब्रम्हा सनसिटी सोसायटीचे व्यवस्थापकीय समिती सदस्य नागेंद्र रामपुरिया म्हणाले, सोसायटीच्या बागेत खेळत असलेल्या सहा वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. सोसायटीत कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून श्वान पाळणारे ते मानायला तयार नाहीत. कुत्र्यांना जेरबंद करण्यासाठी व्हॅन घेऊन आल्यावर हे श्वानप्रेमी महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धमकावतात. आम्ही खूप धास्तीत राहत आहोत. 15 ऑक्टोबर रोजी एका 40 वर्षीय महिलेवर 4 ते 5 कुत्र्यांनी हल्ला केला होता.

ब्रम्हा सन सिटी सीएचएसमधील एका रहिवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, “या कुत्र्यांमुळे  रहिवाशी भयभित आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वांनाच कुत्र्यांचा धोका आहे. आम्ही महापालिका अधिकारी तसेच पोलीसांकडेही गाऱ्हाणे मांडले. परंतु, कोणीही गांभिर्याने समस्या सोडविण्यासाठी पावले उचलली नाहीत.

पुणे महानगरपालिकेच्या  पशुवैद्यकीय अधीक्षक डॉ. सारिका फुंडे यांनी ‘मिरर’शी बोलताना सांगितले कीब्रम्हा सन सिटी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील प्रकाराची माहिती समजली आहे. या कुत्र्यांना पकडून दहा दिवसा निरिक्षणात ठेवण्यात यईल. त्यांच्यातील रेबीजची तपासणी केली जाईल. एखादा कुत्रा पिसाळलेला असल्याचे आढळल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल.

अ‍ॅनिमल रेस्क्यू ट्रस्टच्या  सह-संस्थापक विनीता टंडन म्हणाल्या, सोसायटीच्या सदस्यांनी कुत्र्यांबरोबर राहण्याची सवय करून घेतली पाहिजे. कुत्र्यांना दुसरीकडे हलवू नये असे न्यायालयाचे आदेश आहेत. कुत्र्यांसोबत कसे राहायचे आणि लहान मुलांनी काय काळजी घ्यावी याचे शिक्षण द्यायला आम्ही तयार आहाेत. मात्र, सोसायटीचे् सदस्य त्यासाठी तयार नाहीत. कोणालाही त्रास होऊ नये अशीच आमची भावना आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये एका 7 वर्षाच्या मुलाला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता. त्यावेळी श्वानप्रेमी आणि आणि सोसायटी सदस्यांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला होता, नंतर सोसायटीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest