Pune Metro : पुणे मेट्रो व्यवसायासाठी उपलब्ध करून देणार ३८ जागा, व्यावसायिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

पुणे मेट्रो आपल्या प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि जलद प्रवासाचा अनुभव देते. पुणे मेट्रोच्या स्थानकांवर पिंपरी चिंचवड ते पुण्यापर्यंत दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. नोव्हेंबर 2023 पर्यंत, एकत्रित प्रवासी संख्या ८८,१८,७६१ पर्यंत पोहोचली आहे, दररोज सरासरी 53,000 प्रवासी मेट्रोतुन प्रवास करतात.

 Pune Metro : पुणे मेट्रो व्यवसायासाठी उपलब्ध करून देणार ३८ जागा, व्यावसायिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

संग्रहित छायाचित्र

पुणे : मेट्रो रेल्वे प्रकल्पामध्ये दोन मार्गिकांचा समावेश आहे: उत्तर-दक्षिण मार्गिका (पर्पल लाईन) आणि पूर्व-पश्चिम मार्गिका (ऑक्वा लाईन).  मेट्रो प्रकल्पाची एकूण लांबी 33.2 किलोमीटर आणि 30 यांत स्थानकांचा समावेश असून या प्रकल्पात 27.2 किलोमीटरचा एक उन्नत विभाग आणि 6 किलोमीटरपर्यंत एक भूमिगत विभाग आहे. 6 मार्च 2022 रोजी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचा लोकार्पण समारंभ झाला. त्यावेळी 10 स्थानके अधिकृतपणे प्रवासासाठी खुली करण्यात आली. त्यानंतर, 1 ऑगस्ट 2023 रोजी, भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते आणखी 11 स्थानकांचे उद्घाटन करण्यात आले. आतापर्यंत, एकूण 33.2 किलोमीटरपैकी 23.66 किलोमीटरचे मार्ग लोकांसाठी खुले करण्यात आले आहेत. उर्वरित ९.६२ किमीचे काम वेगाने सुरू आहे.

पुणे मेट्रो आपल्या प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि जलद प्रवासाचा अनुभव देते. पुणे मेट्रोच्या स्थानकांवर पिंपरी चिंचवड ते पुण्यापर्यंत दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. नोव्हेंबर 2023 पर्यंत, एकत्रित प्रवासी संख्या ८८,१८,७६१ पर्यंत पोहोचली आहे, दररोज सरासरी 53,000 प्रवासी मेट्रोतुन प्रवास करतात. आजमितीस एका दिवसात सर्वाधिक रायडरशिप 1,69,512 आहे. मेट्रोचा संपूर्ण मार्ग नागरिकांसाठी खुला झाल्यानंतर ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

ही मोठ्या प्रमाणातील प्रवासी संख्या लघु व्यवसाय मालक, किरकोळ विक्रेते आणि उद्योजकांना मेट्रो स्टेशन परिसरात व्यवसाय प्रस्थापित करण्याची एक आशादायक संधी उपलब्ध करते. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाने किरकोळ परवाना प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामुळे व्यवसायांना मेट्रो परिसरामध्ये व्यावसायिक जागा सुरक्षित करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

पुणे मेट्रोने 100 चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या किरकोळ व्यवसायाच्या जागांसाठी परवाना देण्यासाठी पुणे मेट्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर निविदा काढल्या आहेत. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या मार्गिका -1 आणि मार्गिका-2 मधील निवडक मेट्रो स्थानकांवर 09 वर्षांच्या कालावधीसाठी एकूण 38 रिटेल बिझनेस स्पेस उपलब्ध आहेत, जे संभाव्य खरेदीदारांसाठी एक अनन्य आणि किफायतशीर व्यवसाय संभावना देतात.

पारदर्शकता आणि सुलभता वाढवण्यासाठी निविदा प्रक्रिया ऑनलाइन केली जाईल. इच्छुक व्यावसायिक अधिकृत संकेतस्थळाद्वारे त्यांच्या निविदा सादर करू शकतात. अधिक तपशीलवार माहितीसाठी आणि निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी, कृपया अधिकृत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प निविदा पृष्ठाला भेट द्या (http://www.punemetrorail.org/Tenders.aspx ). पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प या निविदा प्रक्रियेचा भाग होण्यासाठी उत्साही व्यवसायांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest