Pune : पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर 22 यार्डस संघ विजयी

पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत ऋषिकेश दौंड(190धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीसह व्यंकटेश्वर चव्हाण(5-67)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर 22 यार्डस संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाविरुद्ध पहिल्या डावात 177 धावांची आघाडी घेत विजय मिळवला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Eeshwari Jedhe
  • Fri, 3 Nov 2023
  • 09:00 pm

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर 22 यार्डस संघ विजयी

पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत ऋषिकेश दौंड(190धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीसह व्यंकटेश्वर चव्हाण(5-67)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर 22 यार्डस संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाविरुद्ध पहिल्या डावात 177 धावांची आघाडी घेत विजय मिळवला.

वीरांगन क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या दोन दिवसीय लढतीत दुसऱ्या दिवशी क्लब ऑफ महाराष्ट्रचा पहिला डाव १६ षटकात ५बाद ६४ धावापासून पुढे खेळ सुरु झाला. तत्पूर्वी काल 22 यार्डस संघाने 68.5 षटकात सर्वबाद 320धावा केल्या. याच्या उत्तरात क्लब ऑफ महाराष्ट्रचा डाव 37.4 षटकात सर्वबाद 143धावावर संपुष्टात आला. यात यश भंडारी नाबाद 27, धीरज मदने 31, अक्षित इंगळे 15 यांनी थोडासा प्रतिकार केला. 22 यार्डस संघाकडून व्यंकटेश्वर चव्हाण(5-67), वेदांत काळे(3-45) यांनी सुरेख गोलंदाजी करत पहिल्या डावात संघाला 177 धावांची आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या डावात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाला दिवस अखेर 58.2 षटकात सर्वबाद 266धावा करता आल्या. यात केदार बजाजने 119चेंडूत 14चौकार व 1 षटकारासह 108 धावांची शतकी खेळी केली. त्याला धीरज मदने 56, यश हळे 42 धावा काढून साथ दिली. 22 यार्ड्स संघाकडून कूष पाटील(3-10), श्रीनिवास लेहेकर(2-39), व्यंकटेश्वर चव्हाण(2-58) यांनी अचूक गोलंदाजी केली. दोन्ही संघातील सामना अनिर्णित राहिल्यामुळे 22 यार्ड्स संघाने पहिल्या डावाच्या अधिक्याच्या जोरावर विजय प्राप्त केला.

निकाल: वीरांगन क्रिकेट मैदान:

पहिला डाव: 22 यार्डस: 68.5 षटकात सर्वबाद 320धावा वि. क्लब ऑफ महाराष्ट्र: 37.4 षटकात सर्वबाद 143धावा(यश भंडारी नाबाद 27, धीरज मदने 31, अक्षित इंगळे 15, व्यंकटेश्वर चव्हाण 5-67, वेदांत काळे 3-45); 22 यार्ड्स संघाकडे पहिल्या डावात 177 धावांची आघाडी

दुसरा डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र : 58.2 षटकात सर्वबाद 266 धावा(केदार बजाज 108(119,14x4,1x6), धीरज मदने 56(58,6x4,3x6), यश हळे 42(65,7x4), कूष पाटील 3-10, श्रीनिवास लेहेकर 2-39, व्यंकटेश्वर चव्हाण 2-58) वि.22 यार्ड्स: ; सामना अनिर्णित; 22 यार्ड्स संघ पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest