तेराव्या ओम दळवी मेमोरियल डॉ.नितु मांडके करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत देशभरांतून 200हून अधिक खेळाडू सहभागी
ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या तेराव्या ओम दळवी मेमोरियल डॉ.नितु मांडके करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे दि.4 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.
ओम दळवी मेमोरियल फाऊंडेशनचे ट्रस्टी उमेश दळवी आणि ओम दळवी मेमोरियल फाऊंडेशनचे चेअरमन विक्रम बोके यांनी सांगितले की, ही स्पर्धा गुणवान टेनिसपटू ओम दळवी याच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आली आहे. ओम दळवीचे 2009 मध्ये आकस्मिक निधन झाले होते. स्पर्धेला डॉ.नितु मांडके फाऊंडेशन यांचे प्रायोजकत्व लाभले असून डॉ. प्रकाश घाटगे, सिनर्जी प्रॉपर्टीज, मायक्रो इनोटेक, ग्रीन स्पॅन एग्रिटेक यांनी सहप्रायोजित केले आहे.
स्पर्धेत महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, केरळ, हिमाचल प्रदेश, अरूणाचल प्रदेश, तामिळनाडू आणि राजस्थान या ठिकाणांहून 200 हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेत एकुण 1लाख 50 हजार रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्याला 50एआयटीए गुण, उपविजेत्याला 40 गुण मिळणार आहेत.
डॉ.नितु मांडके फाऊंडेशनचे संचालक मंदार मांडके म्हणाले की, या स्पर्धेला पाठिंबा देऊन आम्हाला खुप आनंद झाला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गुणवान व उद्योन्मुख खेळाडूंना आपली गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी श्रीराम गोखले यांची एआयटीए सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली. आहे. स्पर्धेत मुलांच्या गटात पार्थ देवरुखकरला, तर मुलींच्या गटात गुजरातच्या हिरवा रंगणी हिला अग्रमानांकन देण्यात आले आहे.