इंडो ऍथलेटिक्स सोसायटीच्या शंभर सायकलिस्टचा १२०० किमी सायकल प्रवास यशस्वी पूर्ण
दरवर्षी लांब पल्ल्याच्या राईड आयोजित करण्याचे सलग तिसरे वर्ष असून यापूर्वी पुणे ते कन्याकुमारी पुणे ते गोवा पुणे ते हम्पी आणि आता पुणे ते सोमनाथ गुजरात आयोजन करण्यात आले. शनिवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजता निगडी भक्ती शक्ती येथून सुरुवात करण्यात आली. उद्योजक अन्नारे बिरादार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी हेमंतराव हरहरे, मिलिंद डांगे, सनदी लेखापाल कृष्णलाल बंसल, देवराई फाऊंडेशनचे धनंजय शेडबाळे इंडो अथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आला.
दरम्यान एनर्जेल साठी प्रदीप टाके, प्रोटीन साठी मदन शिंदे , टीशर्ट साठी नितीन पवार, काही ठिकाण चे ब्रेकफास्ट साठी सुनिल चाको, चिंतन देसाई, स्वामीनाथन श्रीनिवासन, गणपत मासाळ यांनी सहकार्य केले. गुजरात येथील विविध स्थानिक ग्रुप सदस्य वर्षा शहा, श्वेता व्यास, नितीश सिंग, राजेश्वर राव, सी आय एस एफ चे अधिकारी विश्वास गवळी, श्रीराम बाबर यांचे विशेष सहकार्य लाभले प्रमाणे वलसाड आणि भरूच येथील स्वामी नारायण मंदिर, वटामन येथे इंद्रगज जैन मंदिर, गोंदल येथील भुवनेश्वरी देवी पीठ, जुनागड येथे गोरक्षनाथ संस्थान तर्फे तर सोमनाथ येथे मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे सर्व साईकलिस्ट चे भव्य स्वागत करण्यात आले.
बाराशे किलोमीटर प्रवासाचा मार्ग आणि उद्देश खालील प्रमाणे होता
पुणे - वसई - वलसाड - भरूच - स्टॅच्यू ऑफ युनिटी - वटामन - गोंधल - जुनागड - सोमनाथ - गीर अभयारण्य - गिरनार असा बारशे किलोमीटरचा प्रवास आठ दिवसांचा होता. उद्देश देशांमध्ये सायकल पर्यटन वाढवणे, युवा पिढी मध्ये क्रीडा आरोग्य , ऑफिसला जाण्यासाठी आणि शाळेमध्ये जाण्यासाठी जास्तीत जास्त सायकलचा वापर व्हावा आणि आपल्या देशातील प्रदूषण कमी होण्यासाठी हातभार लागावा याबद्दल याबद्दल प्रबोधन करणे असा विविध हेतूने देशभर इंडो अथलेटिक सोसायटी दरवर्षी देशातील विविध राज्यांमध्ये लांब पल्ल्याची राईट आयोजित करत असते.
मागील वर्षी पुणे टू कन्याकुमारी, पुणे टू हम्पी , पुणे टू गोवा या आणि अशा प्रकारे विविध राईट्स आत्तापर्यंत पूर्ण केल्या आहेत , ३५,००० सभासद संख्या असलेली ही भारतातील सर्वात मोठी संस्था आहे, देशातील प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरण राखणे आणि युवा पिढीला आरोग्याबाबत महत्त्व पटवून देणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहेत. भारत सरकार तर्फे 2019 मध्ये संस्थेला सीएसआर त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स विभागाची ८० जी आणि १२ अ प्रमाणपत्र प्राप्त झालेली आहेत. आपल्यातर्फे मिळालेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
सदर प्रवासामध्ये तब्बल 100 जणांचा सहभाग होता यामध्ये गिरीराज उमरीकर, अमित पवार, योगेश तावरे, नितीन पवार, महेश मगदूम, युवराज पाटील, आनंद गुंजाळ, संकेत कुमार चव्हाण, महादेव पाटील, चिंतन देसाई, स्वामीनाथन श्रीनिवासन, सुनील चाको, नंदकुमार नखाते, दादासाहेब नखाते, प्रशांत सगरे, संतोष साळुंखे, संदीप गायकवाड, सोपान औटी, नारायण औटी, प्रणय कडू देविदास थिटे, संतोष टोणपे, प्रभाकर पवार, वैभव तांबे, अमित नखाते, नंदकुमार उत्तेकर, विवेक कडू, श्रीकांत चौधरी, प्रशांत जाधव, अविनाश अनुशे, चिन्मय पाटील, दत्तात्रय आनंदकर, रोहित दिघे, पंकज मुनोली, देवेंद्र नेमाडे माणिकराव पाटील संतोष पाथरूडकर, सुरेंद्र कुलकर्णी, प्रो. ज्ञानेश्वर कानडे, ॲड. पंजाबराव इंगळे, श्रीकांत परीकीपडला, अशोक पालेकर, संजय गजभये, तानाजी व्हनमने, मुकुंद दांगट पाटील, सचिन निफाडकर, संकेत उपळेकर, देविदास खुर्द, रमेश माने, भूपेंद्र डेरवणकर, अविनाश चौगुले, मंगेश चौधरी, मनोज चोपडे, राहुल जाधव, नितीन शिरसाट, सुजित नाईक, प्रदीप साळी, संदीप दुधादे, केशवराव ठावकर, मोरेश्वर पिदादी, मदन शिंदे, दीपक उमरानकर, देवेंद्र मोरे, अमित भोजे, महेश कुलकर्णी, सागर शिरभाते, अजित गोरे, श्रीकांत बोरसे, दीपक बुर्कुल, प्रदीप टाके, रमेश सेंचा, अजित माने , प्रशांत तायडे, अक्षय चांदवडकर, मारुती विधाते, अभिजीत सरोदे, ज्ञानेश्वर तांबे, महेश मोरे, अभिजीत रोडे, अभय खटावकर, तसेच नियोजनामध्ये श्री कैलास शेठ तापकीर, कपिल पाटील, संतोष साळुंखे मेजर यांचे सहकार्य मिळाले.
जुनागड येथून रेल्वेने चिंचवड स्टेशनला आल्यानंतर सर्व आयएएस गुजरात टीमचे भव्य स्वागत रांगोळी काढून , औक्षण आणि सर्वांना हार घालून करण्यात आले यामध्ये अस्मिता पाटील, रुबी चौधरी, मोहीनी गोरे, सविता बोरसे, भाग्यश्री बुरुकुल, हरिप्रिया शशिकुमार, सुशील मोरे, निकिता चौगुले, अमृता पाटील, युवराज पाटील, अश्विनी पाटील आदींचा समावेश होता.