Train : लातूरला जाण्यासाठी पुणेकर आतूर

पुणे ते लातूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला आहे. पुणे रेल्वे विभागाने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुश केले आहे. पुणे रेल्वे विभागाकडून पुणे-लातूर-पुणे अशी नवीन रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर-पुणे या मार्गावरील रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. याच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. हे लक्षात घेत पुणे रेल्वे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयास पाठवण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 26 Apr 2023
  • 07:17 am
लातूरला जाण्यासाठी पुणेकर आतूर

लातूरला जाण्यासाठी पुणेकर आतूर

पुणे-लातूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अखेर दिलासा, पुणे-लातूर-पुणे अशी नवीन रेल्वे: सोलापूर, उस्मानाबादला जाणाऱ्या प्रवाशांची चिंता मिटली

#पुणे

पुणे ते लातूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला आहे. पुणे रेल्वे विभागाने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुश केले आहे. पुणे रेल्वे विभागाकडून पुणे-लातूर-पुणे अशी नवीन रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर-पुणे या मार्गावरील रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. याच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. हे लक्षात घेत पुणे रेल्वे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयास पाठवण्यात आला आहे.

लातूरमार्गे जाणाऱ्या गाड्यांना कायम गर्दी असल्यामुळे नागरिकांकडून लातूर विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून केली जात होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे कोच उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा सुरू केली जात नव्हती. आता रेल्वेचे कोच उपलब्ध झाल्यामुळे आणि नागरिकांच्या मागणीचा विचार करता पुणे विभागाने लातूरसाठी रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  पुण्यातून लातूरला जाण्यासाठी बिदर एक्स्प्रेस, नांदेड एक्स्प्रेस आणि हैदराबाद एक्स्प्रेस अशा गाड्या आहेत. यातील दोन गाड्या रात्री आहेत, तर हैदराबाद एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस हडपसर टर्मिनलवरून सकाळी सुटते. या गाड्यांना 

खूपच गर्दी असते. त्यामुळे लातूरला जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना 

करावा लागत होता.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story