Pune is a city dreams of youth : पुणे हे युवकांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर : पंतप्रधान मोदी

पुणे शहर हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे, युवांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर आहे, असे प्रतिपादन मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी यांनी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 2 Aug 2023
  • 10:58 am
पुणे हे युवकांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर : पंतप्रधान मोदी

पुणे हे युवकांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर : पंतप्रधान मोदी

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

पुणे शहर हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे, युवांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर आहे, असे प्रतिपादन मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी यांनी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात मेट्रो लोकार्पणासह पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. मोदी पुढे म्हणाले, शहरी मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीविषयी सरकार गंभीर असून सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक बनवावे लागेल. त्या दृष्टीने पुणे शहरात मेट्रो सुरू करण्यात आली असून मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा बनत आहे. या पाच वर्षात पुण्यात सुमारे २४ किलोमीटर मेट्रोचे नेटवर्क सुरू झाले आहे. २०१४ पर्यंत देशात २५० किलोमीटरपेक्षा कमी मेट्रो नेटवर्क होते. आता देशात ८०० किलोमीटरपेक्षा अधिक मेट्रोचे जाळे तयार झाले असून आणखी १ हजार किलोमीटरचे काम सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story