Pune Jalgaon : पुण्याचे झाले 'जळ'गाव

जिल्ह्यातील सर्वाधिक उष्ण गाव म्हणून शुक्रवारी (ता.१२) शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावाची नोंद झाली आहे. या गावांत आज जिल्ह्यातील सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून जिल्ह्यातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून शिरुरची नोंद झाली आहे. शिरूरचे आजचे तापमान ४३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 13 May 2023
  • 01:42 pm
पुण्याचे झाले 'जळ'गाव

पुण्याचे झाले 'जळ'गाव

तळेगाव ढमढेरेत जिल्ह्यातील सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

जिल्ह्यातील सर्वाधिक उष्ण गाव म्हणून शुक्रवारी (ता.१२) शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावाची नोंद झाली आहे. या गावांत आज जिल्ह्यातील सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून जिल्ह्यातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून शिरुरची नोंद झाली आहे. शिरूरचे आजचे तापमान ४३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे.

हवामान विभागाने आज पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वाधिक तापमान असलेली गावे व शहरांची यादी जाहीर केली. यामध्ये किमान ३५ अंश सेल्सिअस आणि त्याहून अधिक तापमान नोंदल्या गेलेल्या गावांचा समावेश केला आहे. सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली अनुक्रमे तीन गावे (शहरांसह) ही पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील असल्याचे या यादीवरून स्पष्ट झाले आहे.

किमान ४० अंश सेल्सिअस आणि त्याहून अधिक तापमान असलेल्यांमध्ये तळेगाव ढमढेरे, शिरूर, राजगुरुनगर, डुडुळगाव (पिंपरी चिंचवड), लवळे (ता. मुळशी), पुरंदर, कोरेगाव पार्क व वडगाव शेरी (दोन्ही पुणे शहर), दौंड, आंबेगाव, चिंचवड, गिरीवन (ता. मुळशी), शिवाजीनगर, हडपसर, पाषाण व एनडीए परिसर (सर्व पुणे शहर) आणि बल्लाळवाडी आदी गावे व शहरांचा समावेश आहे.

शहरात कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक तापमान दरम्यान, शुक्रवारी पुणे शहरातील सर्वाधिक तापमानाची नोंद कोरेगाव पार्क या परिसरात झाली आहे. येथील तापमानाचा पारा ४१.८ अंश सेल्सिअसवर गेला आहे. त्यामुळे कोरेगाव पार्क हे शहरातील सर्वाधिक उष्णता असलेले ठिकाण बनले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story