आरोपी पळाल्याने पोलीस निलंबित

न्या यालयातून तुरुंगात नेत असताना ताब्यातील आरोपी पळून गेल्याने पोलीस हवालदार मुरलीधर महादु कोकणे, राजूदास रामजी चव्हाण आणि अन्य एका पोलीस कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी हा आदेश काढला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 7 Aug 2023
  • 11:21 am
आरोपी पळाल्याने पोलीस निलंबित

आरोपी पळाल्याने पोलीस निलंबित

पाणी पिण्यासाठी उतरलेला आरोपी दुचाकीवरून पसार

#पुणे 

न्या  यालयातून तुरुंगात नेत असताना ताब्यातील आरोपी पळून गेल्याने पोलीस हवालदार मुरलीधर महादु कोकणे, राजूदास रामजी चव्हाण आणि अन्य एका पोलीस कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी हा आदेश काढला आहे.

हे तीन पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालयात नेमणुकीला आहेत. येरवडा कारागृहातून आरोपींना घेऊन त्यांना सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. कामकाज संपल्यावर आरोपींना पुन्हा येरवडा कारागृहात जमा करण्याची त्यांची जबाबदारी होती. त्याप्रमाणे त्यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यातील एक आरोपी राजेश रावसाहेब कांबळे याला पुढील तारीख देण्यात आली. तीन पोलीस कर्मचाऱ्यांपैकी दोघेजण अन्य आरोपीसमवेत थांबले. राजूदास चव्हाण हे  राजेश कांबळे याला खासगी रिक्षाने येरवडा कारागृहात नेत होते. यावेळी आरोपीने तहान लागल्याचे सांगितल्याने वाटेत रिक्षा थांबवली. कांबळे रिक्षातून उतरला आणि साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यातील आरोपी पळून गेल्याने तिघा पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना २ ऑगस्ट रोजी घडली होती.        feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story