पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर छापा

बिबवेवाडी आणि मार्केट यार्ड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून १८ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 27 Mar 2023
  • 11:29 am
पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर छापा

पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर छापा

बिबवेवाडी, मार्केट यार्ड परिसरात रंगत होते तीर्रटचे डाव; गुन्हे शाखेकडून १८ जणांविरुद्ध गुन्हा

#बिबवेवाडी

बिबवेवाडी आणि मार्केट यार्ड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून १८ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

बिबवेवाडी आणि मार्केट यार्ड परिसरात तीर्र्टचे डाव रंगत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना खबऱ्याकरवी मिळाली होती. मार्केट यार्ड परिसरात पत्त्यावर जुगार खेळला जात असल्याचे समोर आले होते. खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने तेथे छापा टाकून दहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी रोकड आणि जुगाराचे साहित्य असा ४१ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एकूण ११ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडी भागात मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने कारावाई करून सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोकड आणि जुगाराचे साहित्य असा दहा हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,  उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेंद्र कुमावत, अजय राणे, बाबा कर्पे आदींनी ही कारवाई केली.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story