पीएमपी बसचा थांबा थेट पोलीस ठाण्यात

पीएमपी बसचा वाहक आणि प्रवासी यांच्यातील वादाने हाणामारीचे स्वरूप धारण केले आणि या बसचा थांबा थेट पोलीस ठाण्यात गेल्याची घटना समोर आली आहे. यामुळे सर्व प्रवाशांना तासभर ताटकळत बसावे लागले. पिंपरी-चिंचवडच्या मोशी भागात ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. पास काढण्यावरून हा वाद झाल्याचे वाहक आणि प्रवासी किरण श्रीखंडे यांनी सांगितले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 31 Mar 2023
  • 05:34 pm
पीएमपी बसचा थांबा थेट पोलीस ठाण्यात

पीएमपी बसचा थांबा थेट पोलीस ठाण्यात

एक दिवसाचा पास काढूनही फाडले तिकीट; वाहकाची प्रवाशासोबत हाणामारी

#मोशी

पीएमपी बसचा वाहक आणि प्रवासी यांच्यातील वादाने हाणामारीचे स्वरूप धारण केले आणि या बसचा थांबा थेट पोलीस ठाण्यात गेल्याची घटना समोर आली आहे. यामुळे सर्व प्रवाशांना तासभर ताटकळत बसावे लागले. पिंपरी-चिंचवडच्या मोशी भागात ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. पास काढण्यावरून हा वाद झाल्याचे वाहक आणि प्रवासी किरण श्रीखंडे यांनी सांगितले.

राजगुरुनगर येथून भोसरीकडे निघालेली बस चाकणमध्ये आली. तेव्हा आंबेठाण चौकात किरण नावाची व्यक्ती बसमध्ये बसली. त्याने मोशीपर्यंतचे पंधरा रुपयांचे तिकीट काढले. त्यापुढे एक दिवसाचा पन्नास रुपयांचा पास त्याने मागितला, पण यावेळी गैरसमजातून वाहकाने पुन्हा मोशीपर्यंतचे तिकीट फाडले आणि यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले. वादाचे रूपांतर एकमेकांवर हात उचलण्यापर्यंत गेले. भांडण मिटत नसल्याचे पाहून चालकाने बस मोशी पोलीस चौकीत नेली. त्या ठिकाणी पोलीस उपस्थित नव्हते. नंतर शेवटी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये बस आणली गेली. कंडक्टर आणि किरणने परस्परविरोधी तक्रारी केल्या. पुढील कारवाई पोलिसांकडून सुरू झाली. नंतर बस पुढे मार्गस्थ झाली.

दरम्यान प्रवासी आणि कंडक्टरच्या झालेल्या वादावादीत मात्र प्रवाशांना तासभर ताटकळत बसावे लागले. बस दोन पोलीस स्टेशनमध्ये गेली, त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. या वेळात प्रवासी खोळंबले. या दरम्यान सगळे प्रवासी संतापले होते. त्यांना कामासाठी जाण्यासाठी देखील उशीर झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story