Walmik Karad luxury flats in Hi-Fi area of Pimpri Chinchwad
संतोष देशमुख हत्याप्रकरणी संशयित मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबात धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावे, ड्रायव्हरच्या नावे अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून काही दिवसांपुर्वी करण्यात आला होता. दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये हायफाय एरियामध्ये कराडचा कोट्यांवधी रुपयांचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर या फ्लॅटचा लवकरच लिलावर होणार असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकडमधील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या पार्क आयव्हरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर 601 नंबर फ्लॅट कराडने पत्नी मंजलीच्या नावावर घेतला आहे. ज्याची किंमत आजच्या बाजार भावनुसार साडे तीन कोटीं इतकी आहे. मात्र, या फ्लॅटवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. मिळकत कर थकवल्याप्रकरणी महापालिकेने फ्लॅटच्या बाहेर नोटीस चिटकवली आहे.
मनपाने नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलं आहे ?
वाल्मिक बाबुराव कराड व मंजली वाल्मिकराव कराड राहणार स.नं.214/2/1 ते 10, 215/1 ते 4, पार्क स्ट्रीट, पार्क आपवरी फेज 2, फ्लॅट नं. H/601, सहावा मजला, औंधरोड, वाकड, पुणे 57. यांनी त्यांचे उक्त पत्यावरील मालमत्ता क्रमांक 1040125144.00 चा सन 2023-2024 या आर्थिक वर्षाअखेर मालमत्ता कराबद्दल येणे असलेली रक्कम रुपये 108,864/-भरलेली नाही, किंवा ती न भरण्याबद्दल माझे समाधान होईल असे पुरेसे कारण दाखविलेले नाही. वाल्मिक बाबुराव कराड व मंजली वाल्मिकराव कराड यांचेकडे उक्त रकमेची रितसर लेखी मागणी करण्यात आली असून जप्ती पूर्वीची नोटीस बजाविलेपासून विहित कलावधी संपलेला आहे.
कर संकलन विभागाचे प्रमुख अविनाश शिंदेंनी एका वृत्तसंस्थेशी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, चालू वर्षाच्या मिळकत कर संबंधीचा बिल महापालिकेने यापूर्वीच त्यांना बजावलेले आहे, आणि मिळकत कराच्या बरोबरच त्यांची एक लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे. त्यांना आपण जप्तीपूर्वीची नोटीस देखील दिलेली आहे, त्यांच्याकडे साधारण एक लाख ५५ हजार ४४४ इतकी थकबाकी आहे. त्याप्रमाणे त्यांना २१ नोव्हेंबर २०२४ला जप्ती अधिपत्र देखील दिलेले आहे.
साधारणपणे महापालिकेकडे १६ जून २०२१ ला या मालमत्ताधारकांची नोंद झाल्याचे दिसून येते, आणि तेव्हापासून त्यांच्याकडे मालमत्ता करत हा थकीत असलेल्या दिसून येतो मालमत्ता सील करण्यात येईल, त्यानंतर त्याच्या पुढची लिलावाची पुढच्या प्रक्रियेत सुरुवात होणार आहे.
पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराडची प्रॉपर्टी
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासमोर असलेल्या इमारतीत कराड आणि त्याच्या टोळीने २५ कोटी रुपये खर्च करून सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचा दावा केला आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बरोबर समोर काम सुरु असलेल्या असलेल्या एका इमारतीत वाल्मिक कराड, त्याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावे सहा ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आल्या आहेत.पंचवीस कोटी रुपये मोजून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने या इमारतीत या ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यासाठी बिल्डरसोबत करार केल्याचं समोर आलं आहे.