पीएमआरडीए गृहप्रकल्पात सुरू होणार बस सुविधा

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सेक्टर १२ या ठिकाणी गृहप्रकल्प उभारले आहेत. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना तसेच, व‍िव‍िध भागातील नागरिकांना संबंध‍ित गृहप्रकल्प पाहता यावा,

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 14 Jan 2025
  • 06:16 pm

संग्रहित छायाचित्र

आयुक्त योगेश म्हसे यांची माहिती, संवाद साधत जाणून घेतल्या समस्या

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सेक्टर १२  या ठिकाणी गृहप्रकल्प उभारले आहेत. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना तसेच, व‍िव‍िध भागातील नागरिकांना संबंध‍ित गृहप्रकल्प पाहता यावा, यासाठी आगामी काही द‍िवसात या ठिकाणी विशेष बसची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांनी दिली.

पीएमआरडीएअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पांसह भूखंडाची पाहणी करत त्यांनी सदन‍िकाधारकांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत पेठ क्रमांक १२ येथे गृहप्रकल्प फेज १ आणि फेज २ उभारण्यात येत असून त्याचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पांना महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी भेट देत नुकतीच कामाची पाहणी केली.

या दरम्यान पूर्वीच्या गृह प्रकल्पातील सदनिकाधारकांच्या अडचणी लक्षात घेत नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पात त्या राहणार नाहीत, याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंध‍ित अध‍िकारी यांच्यासह ठेकेदार यांना दिले. या दरम्यान पह‍िल्या प्रकल्पातील पेठ क्रमांक १२ येथील सदन‍िकांधारकांशी संवाद साधला. येथील सदन‍िकांधारकांच्या प्राप्त झालेल्या बहुतांश अडचणी यंत्रणेच्या माध्यमातून दूर करण्यात आल्या आहेत.

पीएमआरडीएअंतर्गत सध्या पेठ क्रमांक १२ येथे गृहप्रकल्प फेज १ आणि फेज २ यांचे काम सुरू आहे. या ठिकाणची कामे अपेक्षित गतीसह दर्जेदार होत असल्यामुळे नागरिकांना ते पाहता यावे, यासाठी त्यांच्या भेटी आयोजित करण्याचे निर्देश पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

Share this story

Latest