पिंपरी-चिंचवड : महिला उमेदवाराच्या बाळाला मिळाला मायेचा आसरा!

पोलीस भरतीसाठी आलेल्या एका महिला उमेदवाराचे बाळ एकसारखे रडत असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एका महिला कर्मचाऱ्याने त्याला सांभाळत मायेचा आसरा देत आपल्यातील संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.

Pimpri Chinchwad Police

पिंपरी-चिंचवड : महिला उमेदवाराच्या बाळाला मिळाला मायेचा आसरा!

भरतीसाठी आलेल्या उमेदवाराचे बाळ रडत असल्याने महिला पोलिसाने घडवले संवेदनशीलतेचे दर्शन

पोलीस भरतीसाठी आलेल्या एका महिला उमेदवाराचे बाळ एकसारखे रडत असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एका महिला कर्मचाऱ्याने त्याला  सांभाळत मायेचा आसरा देत आपल्यातील संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. आपले बाळ पोलिसांच्या कुशीत सुरक्षित विसावल्याने संबंधित महिला उमेदवाराला भरतीवर लक्ष केंद्रित करता आले. पोलिसांच्या या मदतीबाबत महिलेने पोलिसांचे आभार मानले. (Pimpri Chinchwad Police)

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात २६२ पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इंद्रायणीनगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे ही भरती १९ जून ते १० जुलै या कालावधीत ही प्रक्रिया होत आहे. २६२ जागांसाठी तब्बल १५ हजार ४२ अर्ज आले आहेत. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा असल्याने २५ ते ३० जून या कालावधीत भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. १ जुलैपासून भरती पुन्हा सुरू झाली आहे. शनिवारी (६ जून) पहाटे एक महिला उमेदवार भरतीसाठी आली. तिच्यासोबत तिचे तान्हे बाळ सोबत होते. तान्ह्या बाळाला मैदानाच्या बाजूला ठेवून ती महिला शारीरिक चाचणीसाठी मैदानात होती.

अचानक बाळ रडू लागले. बराच उशीर झाला तरी बाळ एकसारखे रडत होते. हा प्रकार मैदानात असलेल्या महिला पोलीस अंमलदाराने पाहिला. पोलीस महिलेने बाळाला घेऊन कुशीत घेतले. त्यानंतर बाळ शांत झाले. बाळ शांत झाल्याने उमेदवार महिलेने पोलीस भरतीवर लक्ष केंद्रित केले. पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे उमेदवार महिलेने पोलिसांचे आभार मानले.

महिला उमेदवारांसाठीही राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वतंत्र आणि सुव्यवस्थित व्यवस्था असल्याने सुमारे दीडशे उमेदवार महिला या ठिकाणी निवासासाठी आल्या आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी आणि आयुक्त विनय कुमार चौबे हे दररोज प्रत्यक्ष पाहणी करून उमेदवार महिला आणि पुरुष यांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest