पिंपरी-चिंचवड : उद्योगनगरीत आठ महिन्यांत बलात्काराच्या १६३ घटना

बलात्काराच्या घटनांनी राज्यात चिंतेचे वातावरण असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये ओळखीचे लोक, नातेवाईक, मित्र या लोकांकडून महिलांच्या असहायेचा फायदा घेत बलात्कार केल्याच्या घटना घडत आहेत. जानेवारी ते ऑगस्ट २०२४ या आठ महिन्यांच्या कालावधीत बलात्काराचे १६३ गुन्हे दाखल झाले आहेत.

File Photo

नातेवाईक, ओळखीच्या लोकांकडून अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक

बलात्काराच्या घटनांनी राज्यात चिंतेचे वातावरण असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये ओळखीचे लोक, नातेवाईक, मित्र या लोकांकडून महिलांच्या असहायेचा फायदा घेत बलात्कार केल्याच्या घटना घडत आहेत. जानेवारी ते ऑगस्ट २०२४ या आठ महिन्यांच्या कालावधीत बलात्काराचे १६३ गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी या सर्व गुन्ह्यांतील आरोपींना अटक करत गुन्ह्यांची उकल केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढलेली गुन्हेगारी कमी करण्यासाठी शहरात २०१८ मध्ये पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. गुन्हेगारी टोळ्यांना संपविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी शेकडो टोळ्यांवर मकोका कारवाई केली. त्यामुळे शहरातील टोळ्यांही संपत चालल्या आहेत.

एकीकडे या प्रकारची गुन्हेगारी कमी होत असली तरी, अद्यापही शहरातील महिलांच्या सुरक्षीततेचा प्रश्न तसाच आहे. ओळखीचे लोक, नातेवाईक, मित्र, प्रियकर यांच्याकडून महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. शहरात आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर घरफोडी, वाहन चोरी, हाणामरी, दरोडा, खून अशा अनेक प्रकारच्या गुन्हांना आळा बसला. गुन्ह्यांची संख्या कमी झाली. मात्र, लग्नाच्या अमिषाने, प्रेमाच्या जाळ्यात ओढून तसेच ब्लॅकमेल करून महिलांवर बलात्कार केले जात आहेत. गेल्या आठ महिन्यांत या प्रकारच्या १६३ घटना घडल्या आहे. पोलिसांनी या सर्व गुन्ह्यांतील आरोपींना अटक केली आहे.

तांत्रिक गुन्हे

पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत घडणाऱ्या बलात्काराच्या गुन्ह्यांतील ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुन्हे हे तांत्रिक आहेत. काही वर्षांपू्र्वी केलेला बलात्कार, प्रेम संबंध होते; कालांतराने लग्नास नकार दिला. प्रियकाराबरोबर पळून गेल्यानंतर घरच्यांनी सांगितले म्हणून दाखल झालेला गुन्हा. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना तांत्रिक गुन्हे म्हणतात. शहरात सध्या या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे.

हिंजवडी-म्हाळूंगेतील घटनेने शहर हादरले

शहरातील म्हाळूंगे परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीतील ८५ वर्षीय महिलेवर इलेक्ट्रिशनचे काम करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने बलात्कार केला. आरोपीने या वृद्ध महिलेला तीच्या फ्लॅट समोरून ओढून नेत तीचे तोंड दाबून आणि मारहाण करत तीच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी घटनेच्या काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या. मात्र, या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते.

बलात्काराच्या गुन्ह्यांची आकडेवारी

जानेवारी ते ऑगस्ट २०२४

  •  एकूण बलात्कार १६३
  •   गुन्ह्यांची उकल १६३

जानेवारी ते डिसेंबर २०२२

  • एकूण बलात्कार २४३ 
  • गुन्ह्यांची उकल २४१ 

जानेवारी ते डिसेंबर २०२३

  • एकूण बलात्कार २५४
  • गुन्ह्यांची उकल २५४

जानेवारी ते डिसेंबर २०२१ 

  • एकूण बलात्कार १७१ 
  • गुन्ह्यांची उकल १७०

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest