पिंपरी चिचंवड : कारवाईसाठी पािलकेला मिळेना बिल्डरचा पत्ता

महापालिकेचे ड क्षेत्रीय स्थापत्य विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता पिंपळे निलख येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून डकमध्ये अतिक्रमण केले होते. पालिकेच्या डकमधून तब्बल ६० मीटर विद्युत केबल टाकली होती

विद्युत केबल ही डकमधून टाकल्याचे स्थापत्य विभागातील अधिका-यांकडून पाहणी

प्रशासनाने चालवली बांधकाम व्यावसायिकाची पाठराखण, डकमधून अनधिकृत विद्युत केबल टाकणाऱ्याला ना नोटीस, ना कारवाई

महापालिकेचे ड क्षेत्रीय स्थापत्य विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता पिंपळे निलख येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून डकमध्ये अतिक्रमण केले होते. पालिकेच्या डकमधून तब्बल ६० मीटर विद्युत केबल टाकली होती. मात्र, स्थापत्य विभागाने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस दिली नाही, दंडात्मक कारवाईही केलेली नाही. बांधकाम व्यावसायिकाचा सापडत नसल्याने ही कारवाई झाली नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकावर स्थापत्य विभाग मेहेरबान झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुजाण नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.  

पिंपळे निलख येथील बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेच्या ड प्रभाग स्थापत्य विभागाकडून परवानगी न घेता डकमधून अतिक्रमण करत ६० मीटर विद्युत केबल टाकली होती. सर्व्हे नंबंर ६२ पी हिस्सा नं १ + २ मध्ये शविरा डेव्हलपर्स एलएलपी या बांधकाम व्यावसायिकाने स्थापत्य विभागाच्या डकमध्ये अतिक्रमण केले होते. गेल्या कित्येक महिन्यापासून डकमध्ये अतिक्रमण करून ६० मीटर विद्युत केबल टाकून गृहप्रकल्पाचे काम सुरु होते.

याबाबत आम आदमी पार्टीकडून शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यानूसार ड प्रभागातील स्थापत्य विभागाचे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी महापालिकेच्या डकमधून अनधिकृत विद्युत केबल टाकल्याचे निर्दशनास आले. स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६० मीटर टाकलेली विद्युत केबल हे डकमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर संपुर्ण केबल स्थापत्य विभागाकडून जप्त करण्यात आली.

पिंपळे निलख येथील शविरा डेव्हलपर्स यांच्या गृहप्रकल्पाचे काम सुरु होते. त्या ठिकाणी विद्युत केबल ही डकमधून टाकल्याचे स्थापत्य विभागातील अधिका-यांकडून पाहणी दरम्यान निर्दशनास आले. त्यानंतर संबंधित शविरा डेव्हलपर्स बिल्डरांना महापालिकेच्या स्थापत्य विभागाने गेली आठ दिवस झाले नोटीस देखील दिलेली नाही. त्या बिल्डरकडून खुलासा मागविला नाही. त्याशिवाय महापालिकेच्या स्थापत्य धोरणानूसार अनधिकृत डकमध्ये टाकलेली केबल जप्त करुन त्या बिल्डरला सोडून देण्यात आले आहे.

संबंधितावर बिल्डरला १० हजार रुपये प्रति स्केअर मीटर प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही स्थापत्य विभागाकडून अधिका-यांनी सांगितले होते. दरम्यान, महापालिकेच्या स्थापत्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शविरा डेव्हलपर्सच्या संबंधितांना नोटीस दिलेली नाही. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली नाही. मागील आठ दिवसात ड क्षेत्रीय स्थापत्य विभागाने कोणतीही कारवाई न करता शविरा डेव्हलपर्सवर मेहेरबानी दाखविली आहे.

त्यामुळे संबंधित बिल्डरवर स्थापत्य विभागाकडून कारवाई करण्यास चालढकल केली जात आहे. पिंपळे निलख येथील शविरा डेव्हलपर्सने महापालिकेच्या डकमधून अतिक्रमण करुन विद्युत केबल टाकली. त्या बिल्डरवर स्थापत्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केबल जप्त करण्यापलिकडे कोणतीही कारवाई केलेली नाही.

संबंधित शविरा डेव्हलपर्सचे भागीदार बिल्डर कोण-कोण आहेत. याचा शोध महापालिकेचे स्थापत्य विभागातील अधिकारी हे गेल्या आठ दिवसांपासून घेत आहेत. त्यामुळे नेमकी नोटीस कोणास द्यायची, ते बिल्डर सापडत नसल्याने स्थापत्य विभागाकडून नोटीस दिलेली नाही. त्यामुळे बिल्डरचा खुलासा अद्याप आलेला नाही. तसेच दंडात्मक कारवाई देखील करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित बिल्डरला नोटीस देवून दंडात्मक कारवाई न करता स्थापत्य विभागाकडून हे प्रकरण दडपण्यात येत आहे.

महापालिकेच्या डकमधून अनधिकृतपणे शविरा डेव्हलपर्सने विद्युत केबल टाकले होते. ही केबल स्थापत्य विभागाने जप्त केली. पण, संबंधित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस देवून दंडात्मक कारवाई स्थापत्य विभागाकडून केली नाही. तसेच त्या बांधकाम व्यावसायिकावर महापालिकेच्या खोदाई धोरणानूसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.

- त्रषिकेश कानवटे, युवा कार्यकर्ता, आप

एका बांधकाम व्यावसायिकाने स्थापत्य विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता पालिकेच्या डकमधून विद्युत केबल टाकली होती. संबंधित ६० मीटर विद्युत केबल स्थापत्य विभागाने जप्त केली आहे. त्या बांधकाम व्यावसायिकाला अद्याप नोटीस दिलेली नाही. तसेच दंडात्मक कारवाईही केलेली नाही.

- देवण्णा गट्टूवार, कार्यकारी अभियंता, ड प्रभाग, महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest