पिंपरी-चिंचवड: महापालिका उभारणार ज्येष्ठ नागरिक भवन

महापालिकेच्या वतीने शहरात 'ज्येष्ठ नागरिक भवन' उभारणार असून विविध सोयी सुविधांनी युक्त असे भवन हे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या हक्काचे व्यासपीठ ठरणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 4 Oct 2024
  • 06:51 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महापालिकेच्या वतीने शहरात 'ज्येष्ठ नागरिक भवन' उभारणार असून विविध सोयी सुविधांनी युक्त असे भवन हे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या हक्काचे व्यासपीठ ठरणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त (दि.१) आकुर्डी येथील ग.दि.माडगुळकर नाट्यगृह येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माजी उपमहापौर शैलजा मोरे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, बाबुराव फुले, ईश्वरलाल चौधरी, शांताराम सातव, हेमचंद्र जावळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. आयुक्त सिंह म्हणाले, जेष्ठ नागरिक भवनामध्ये भव्य ऑडीटोरियम, सुसज्ज पार्किंग सुविधा, हॉल, ज्येष्ठ नागरिक संघासाठी स्वतंत्र कार्यालय, अशा अनेक सोयीसुविधा या भवनामध्ये नागरिकांसाठी उभारण्यात येणार आहेत. तसेच विविध योजना, उपक्रम, कार्यक्रम आणि जेष्ठ नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक सर्व पायाभूत सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरु आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना अत्यंत महत्वकांशी आहे. ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्यने या योजनेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी ज्येष्ठ व्याख्याते अशोक देशमुख यांनी आपल्या मधुर आणि मिश्कील वाणीतून ज्येष्ठांचे आनंदी जीवन या विषयावर मनोरंजनात्मक प्रबोधन केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest