पिंपरी-चिंचवड : प्रवासी संघटनेने केली रेल्वे स्थानकाची स्वच्छता

घराची दैनंदिन स्वच्छता जसे आपण करतो. त्याप्रमाणे पुणे-लोणावळा परिसरातील रेल्वे स्थानके, लोकल व एक्सप्रेस गाड्यांमध्ये स्वच्छता ठेवण्याचे आवाहन करत चिंचवड प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानक स्वच्छ केले

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 4 Oct 2024
  • 06:10 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

घराची दैनंदिन स्वच्छता जसे आपण करतो. त्याप्रमाणे पुणे-लोणावळा परिसरातील रेल्वे स्थानके, लोकल व एक्सप्रेस गाड्यांमध्ये स्वच्छता ठेवण्याचे आवाहन करत चिंचवड प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानक स्वच्छ केले. या मोहिमेंमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थीही सहभागी झाले होते.महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असते. त्याच धर्तीवर चिंचवड येथे हे अभियान राबवण्यात आले.

चिंचवड रेल्वे स्थानकांचे फलाट, आरक्षण केंद्र व पश्चिमेकडील टिकीट घर व परिसरात आज स्वच्छता केली. यात प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड प्रवासी संघ, स्व.श्रीमती दरूबाई सोशल फाऊंडेशन सहभागी झाले. चिंचवड रेल्वे स्थानक प्रमुख मॅथ्यु जॉर्ज यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वच्छता व शपथ सोहळा पार पडला. प्रतिभा महाविद्यालयाचे प्रा.सुखलाल कुंभार, प्रा.सुप्रिया गायकवाड व राष्ट्रीय सेवा योजनेचे साठ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, मुकेश चुडासमा, तसेच, स्व.श्रीमती दरूबाई सोशल फाऊंडेशनच्या निर्मला माने, दादासाहेब माने समवेत चिंचवड रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक आर.के.तांबे, कर्मचारी मनोहर बोडके, अरविंद कुमार, किरण लगड उपस्थित होते.

प्रवासी संघाचे अध्यक्ष भालदार यांनी उपस्थितांना स्वच्छतेविषयी शपथ देवून आपल्या मनोगतात पुढे ते म्हणाले की, आपण ज्याप्रमाणे आपले घर स्वच्छ ठेवतो. त्याप्रमाणे पुणे-लोणावळा परिसरातील रेल्वे स्थानके, लोकल व एक्सप्रेस गाड्यांमध्ये स्वच्छता ठेवावी. प्रा. कुंभार, डॉ.दिपक शहा तसेच, प्राचार्य डॉ.अरुणकुमार वाळुंज यांनीही मनोगत व्यक्त केले. रेल्वे स्थानक प्रमुख मॅथ्यु जॉर्ज यांनी रेल्वे स्थानक व परिसर स्वच्छता केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest