पिंपरी चिचंवड : पंतप्रधान आवास योजनेला मुदतवाढ

आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून महापालिकेने गृहप्रकल्प उभारले आहेत. महापालिकेने सुरु केल्या आवास योजनेतील काहींचे काम सुरू असून, काही कामे प्रस्तावित आहे

Pradhan Mantri Awas Yojana, Housing projects ,for economically weaker sections, Municipal Corporation housing schemes, Affordable housing initiatives, Progress on housing projects, Housing for low-income families, Urban housing development, Housing solutions for the poor, Economic housing projects, Municipal housing initiatives

File Photo

डुडूळगाव घरासाठी अर्ज करण्यास ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ, सुमारे पाच हजार कुटुंबांना लाभ मिळणार

आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून महापालिकेने गृहप्रकल्प उभारले आहेत. महापालिकेने सुरु केल्या आवास योजनेतील काहींचे काम सुरू असून, काही कामे प्रस्तावित आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचेही घराचे स्वप्न साकार होणार असून सुमारे पाच हजार कुटुंबांना घराचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, डुडुळगाव प्रकल्पातील घरांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यास महापालिकेने मुदतवाढ दिली आहे.

आर्थिक दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. राज्य सरकारने त्यात थोडे अर्थसाहाय्य देऊ केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली. शहरातील पिंपरी, आकुर्डी, चऱ्होली, डुडुळगाव, मोशीतील बोऱ्हाडेवाडी आणि रावेत अशा सहा ठिकाणी पंतप्रधान आवास योजना आखली आहे. त्यातील रावेत प्रकल्प भूसंपादनाबाबत न्यायप्रविष्ट आहे.

चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील घरांची सोडत काढून, वाटप झाले आहे. पिंपरी आणि आकुर्डी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून सदनिका वाटपाच्या टप्प्यावर आहे. डुडुळगाव प्रकल्पासाठी सोमवारपर्यंत (दि. ३० सप्टेंबर) अर्ज प्रक्रिया सुरू होती. आता एक महिन्याची मुदतवाढ केली आहे. या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. लाभार्थींना केवळ १४ लाख १४ हजार १७३ रुपये स्वहिस्सा भरावा लागणार आहे. केंद्र सरकार प्रतिसदनिका दीड लाख आणि राज्य सरकार एक लाख रुपये अनुदान देणार आहे.

 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चऱ्होली आणि मोशीतील बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील सदनिकांचे वाटप झाले आहे. डुडुळगाव प्रकल्पासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. ती आता ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे दीड हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. लाभार्थींनी कागदपत्रांची पूर्तता करून वेळेत महापालिकेच्या संबंधित विभागाकडे सादर करून योजनेचा लाभ घ्यावा.

- अण्णा बोदडे, उपायुक्त, महापालिका

आवास योजनेतील सदनिका

प्रकल्प सदनिका

चऱ्होली .........................................१४४२

बोऱ्हाडेवाडी.................................. १२८८

डुडुळगाव.......................................११९०

आकुर्डी..........................................५६८

पिंपरी.............................................३७०

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest