यंदाचा उन्हाळा डोळ्यातून काढणार पाणी

पिंपरी-चिंचवड भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये सुमारे ७६ टक्के असून, गत वर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात घटत चालला आहे. त्यामुळे आतापासून पिंपरीकरांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.

संग्रहित छायाचित्र

हिवाळ्यातच पाण्याच्या प्रचंड तक्रारी, सोसायटी भागात टँकरच्या फेऱ्या सुरू

पिंपरी-चिंचवड भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये सुमारे ७६ टक्के असून, गत वर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात घटत चालला आहे. त्यामुळे आतापासून  पिंपरीकरांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. पाण्याच्या तक्रारीपुढे महापालिका मूग गिळून गप्प राहात असल्याने नागरिकांना नाई इजालाजास्तव टँकर लॉबीपुढे हात जोडून विनवण्या कराव्या लागत आहेत. हीच स्थिती राहिल्यास येणारा तीन महिन्यांचा उन्हाळाचा भीषण काळ नागरिकांच्या डोळ्यातून पाणी काढणार अशी चर्चा रंगली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील समाविष्ट गावांसोबतच उपनगरातही पाण्याची बोंबाबोंब आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असूनही महापालिका प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, तर काही भागात आताापासून टँकर सुरू झाल्याने नागरिकांना उन्हाळ्यात मोठी टंचाई भासणार असल्याने चिंता वाढू लागली आहे.

दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर म्हणजेच तीन ते चार महिने पाण्याची टंचाई भासते. नागरिक ती कशीबशी सहन करतात. यंदा ऐन हिवाळ्यातच म्हणजे तीन महिने अलीकडे तो त्रास नागरिकांच्या माथी मारला आहे.  पाण्याचा दाब कमी करणे, पाणी अवेळी सोडणे, कमी अधिक प्रमाण असणे या सारख्या असंख्य तक्रारींसोबतच लिकेज आणि पाणी चोरीवर निर्बंध नसल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. पवना धरणाचे शाखा अभियंता यांनी सांगितल्यानुसार सद्यस्थितीत पवना धरणात ७६. ४८ टक्के साठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी साठा ७७.८० टक्केच्या आसपास होता. पाण्याची मागणी वाढू लागल्याने साठा झपाट्याने कामी होत आहे. अद्याप पाण्याच्या संबंधित महापालिकेस कोणतेही पत्र पाठवले नाही. वरिष्ठ शाखेकडून पाठवले असल्यास ते माहीत नसल्याचे शाखा अभियंता रणजीत बरिया यांनी सांगितले. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

बांधकामे वाढली, कूपनलिका कोरड्या : पुणे व लगतच्या भागात मोठ्या प्रमाणात बांधकामात वाढ झाली आहे.  यंदा बांधकामांची संख्या २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याने त्यासाठी वापरणारे पाण्यातही कमालीची वाढ झाली आहे. ठिकठिकाणी दोनशे ते चारशे फूट कूपनलिकांची पातळी कमी झाली आहे.  डिसेंबर महिन्यातच या कूपनलिकांनी तळ गाठला आहे.

पालिकेचे अजब फर्मान : पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असतानाच शहरात पुरेशा प्रमाणात पाणी असल्याचे सांगून नागरिकांनीच साठवण क्षमता करावी व टाकीची सोय करण्याचे आवाहन महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी सवणे यांना संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest