शाळा अनाधिकृत, सांगायचे अधिकृत, विद्यार्थ्यांकडून करायचे भरमसाठ फी वसूली

अखेर शासनाची मान्यता नसताना देखील शाळा चालवत असल्या कारणाने रुडीमेंट इंटरनॅशनल स्कुल ओझरकरवाडी आणि ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कुल, हिंजवडी या शाळांच्या मुख्याध्यापक, संचालक आणि चालकावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 13 Jul 2023
  • 03:48 pm
school : शाळा अनाधिकृत, सांगायचे अधिकृत, विद्यार्थ्यांकडून करायचे भरमसाठ फी वसूली

संग्रहित छायाचित्र

हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन शाळांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी परिसरात असलेल्या दोन शाळांचा अजब प्रकार समोर आला आहे. शाळांना परवाना नसतानाही विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी वसूली केली जात आहे. अनाधिकृत असलेल्या शाळांबाबत अधिकृत असल्याची बतावणी केली जायची. अखेर शासनाची मान्यता नसताना देखील शाळा चालवत असल्या कारणाने रुडीमेंट इंटरनॅशनल स्कुल ओझरकरवाडी आणि ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कुल, हिंजवडी या शाळांच्या मुख्याध्यापक, संचालक आणि चालकावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्याध्यापक सिझा अली खान (बुधराणी नॉलेज फाऊंडेशन संचलीत ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कुल, हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे), संचालक गौतम बुधराणी (बुधराणी नॉलेज फाऊंडेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष / मालक शैक्षणीक संस्थेचे संचालक) आणि चालक तसेच मुख्याध्यापक विनीत भारद्वाज (रुडीमेंट इंटरनॅशनल स्कुल ओझरकरवाडी रोड माण, ता. मुळशी, जि.पुणे) आणि एका महिला असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सुरेश लक्ष्मण साबळे (वय ४७, धंदा-सरकारी नोकरी (केंद्रप्रमुख), रा. रेणुका निवास, शिवकॉलनी गणेशनगर, वाकड रोड थेरगाव, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा चालवत असताना शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि अटींची पुर्तता करणे गरजेचे असते. मात्र, कागदपत्रांची कोणतीही पुर्तता न करता ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कुल आणि रुडीमेंट इंटरनॅशनल स्कुल या दोन्ही शाळा चालवल्या जात होत्या. यासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करून अनधिकृतपणे भरमसाठ फी वसूली केली जात होती.

शाळा अनाधिकृत असताना देखील शाळा अधिकृत आहे असे भासवले जात होते. यासाठी इतर शाळांना दाखला मागणी करणे, विदयार्थांचे शाळा सोडल्याचे दाखले घेणे व विदयार्थांचे शाळा सोडल्याचे दाखले देणे, असे सर्रास प्रकार सुरू होते. शिवाय शाळा चालवत असताना शासनास आवश्यक असलेला कोणताही महसूल भरणा केला जात नव्हता. अखेर हा प्रकार समजताच सुरेश साबळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलीसांनी मुख्याध्यापक, संचालक आणि चालकावर कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest