Pimpri-Chinchwad: विधानसभा निवडणूक, प्रशासन लागले तयारीला, कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

पिंपरी-चिंचवड: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करताच पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात प्रशासनाकडून कामकाजाला सुरुवात केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 18 Oct 2024
  • 03:22 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

आचारसंहिता लागली, कामकाजाला सुरुवात

पिंपरी-चिंचवड: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करताच पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात प्रशासनाकडून कामकाजाला सुरुवात केली आहे. सध्या विविध आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना विधानसभेच्या कामकाजांचे वाटप करण्याचे काम सुरू आहे.

शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील १६ लाख ३४ हजार ७६८ मतदारांसाठी १४४२ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. तसेच तिन्ही मतदारसंघातील मतदान यंत्रे ठेवण्यासाठी जागा निश्चित केल्या आहेत. मतदान यंत्रे आली की त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. शहरातील तिन्ही विधानसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम झाली आहे. मतदानाची केंद्रेही निश्चित आहेत. मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. मतदानाच्या दृष्टीने आवश्यक तयारी झाली आहे. दरम्यान, महापालिकेचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सोडून इतर विभागातील ५० टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामांसाठी वर्ग करण्यात येणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहेत. त्या पूर्ण झाल्या  की कामकाजाला सुरुवात होईल, असेही अधिका-यांकडून सांगण्यात येत आहे.

फिरती तसेच स्थिर सर्वेक्षण पथके
भोसरी विधानसभेतील आदर्श आचारसंहिता, फिरती सर्वेक्षण पथके (एफएसटी) आणि स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी), निवडणुकीतील पैशाचा वापर, अमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू यांची जप्ती यासाठीची यंत्रणा, निवडणूक प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण, निवडणुकीसाठी केलेल्या व्हीएचए, सी- व्हिजिल, केवायसी, सुविधा पोर्टल आदी संगणकीय व्यवस्था, उपयोजके (ॲप्लिकेशन्स) यांची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच मतदारसंघात एक महिला, दिव्यांग, युवा संचालित, संकल्पना आधारित विशेष मतदान केंद्रे, आदर्श मतदान केंद्रे असणार आहेत, अशी माहिती भोसरी विधानसभा मतदारसंघाचे  निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी दिली आहे.

मतदान यंत्रांची तपासणी
शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघासाठी मतदान यंत्रे मागवण्यात आली असून विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर यंत्रांची तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये मतदान यंत्रणाची प्रथमस्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्रणावर मतदानाचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे.

मतदारसंघनिहाय आकडेवारी

मतदारसंघ एकूण लोकसंख्या मतदान केंद्रे

चिंचवड ६ लाख ५० हजार ७०९ ५६१

पिंपरी ३ लाख ८७ हजार ७ ३९८

भोसरी ५ लाख ९७ हजार ५२ ४८३

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest