पालिका आणखी १५ जागा मेट्रोला देणार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते निगडी या मेट्रो मार्गिकेच्या अनुषंगाने पालिका हद्दीतील एकूण १५ जागा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला हस्तांतरण करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती भूमि व जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली.

महानगरपालिकेने दापोडी ते पिंपरी मेट्रो मार्गाकरिता मौजे पिंपरी येथील ५ जागा, वल्लभनगर येथील २ जागा, फुगेवाडी येथील २ जागा आणि दापोडी येथील १ जागा अशा एकूण १० जागांचा आगाऊ ताबा पालिका सभेच्या ठरावानुसार अटी व शर्तीवर ३० वर्षे कालावधीसाठी महामेट्रोला २०१८ साली दिला आहे. आता पिंपरीतील महापालिका भवन ते निगडी मार्गिकेच्या कामासाठी आकुर्डी येथील ४, निगडी येथील ८ आणि चिंचवड येथील ३ अशा एकुण १५ जागा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला देण्याची कार्यवाही सुरू आहे.

याकरिता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड व पिंपरी चिंचवड महापालिकेत उत्तम समन्वय असून यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही संस्थेचे संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. तसेच, जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरळीतरित्या सुरू असून त्यात कोणताही अडथळा नाही. महामेट्रोची स्थिरता व वित्तीय व्यवहार्यता तसेच तिकीटोत्तर उत्पन्न वाढविण्यासाठी आवश्यक जमिनीचा वाणिज्यिक वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या हद्दीत असलेल्या या जमिनी मालकी हक्काने व बिनशर्त देण्यात याव्यात अशी विनंती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने महाराष्ट्र शासनास केली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest