अवघ्या दीड महिन्याचा संसार मोडला, जाचाला कंटाळून विवाहितेची इंद्रायणीत उडी

माहेरून पैसे आणि मोटारसायकल आणण्यासाठी विवाहितेचा सातत्याने छळ केला जाता. अखेर मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून २४ वर्षीय विवाहित तरुणीने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 6 Jul 2023
  • 04:37 pm
 Indrayani : अवघ्या दीड महिन्याचा संसार मोडला, जाचाला कंटाळून विवाहितेची इंद्रायणीत उडी

जाचाला कंटाळून विवाहितेची इंद्रायणीत उडी

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला पोलीसांनी केली अटक

माहेरून पैसे आणि मोटारसायकल आणण्यासाठी विवाहितेचा सातत्याने छळ केला जाता. अखेर मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून २४ वर्षीय विवाहित तरुणीने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना पिंपरी चिंचवडमधील तळेगाव ताभाडे परिसरात घडली आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीसांनी विवाहितेच्या पतीला अटक केली आहे.

कौशल पिराजी भोसले (रा. इंद्रायणी मंगल कार्यालयाजवळ, तपोधाम कॉलनी, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे ता. मावळ जि पुणे) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी २४ वर्षीय मृत विवाहित तरुणीच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीचे तरुणीचे कौशल भोसले सोबत दिड महिन्यापुर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर तळेगाव ताभाडे येथील असलेल्या घरी तरुणी नांदत होती. मात्र, कौशल भोसले विवाहितेला माहेरून पैसे आणि मोटारसायकल घेऊन ये. तसेच नोकरीचा एक वर्षापासुनचा पगार घेवून ये असा सारखा तगादा लावत होता. यासाठी विवाहितेला मानसिक व शाररीक छळ करून शिवीगाळ व हाताने मारहाण देखील करत होता.

अखेर पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने लग्नाचे दिडच महिन्यात इंद्रायणी नदी पात्रात ३ जुलै रोजी उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी मुलीच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलीसांनी कलम ३०६, ४९८ अ, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करून कौशल भोसले याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest