पिंपरी आणि आकुर्डीतील तब्बल ९३८ घरांसाठी महापालिकेने मागविले अर्ज

महानगरपालिकेच्या हद्दीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात येणाऱ्या नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागवून, छाननी करुन लाभार्थी निश्चित करण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे नियोजन आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांनी २८ जून पासून प्रकल्पातील घरासाठी अर्ज करावा असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 26 Jun 2023
  • 01:18 pm
Pimpri and Akurdi : पिंपरी आणि आकुर्डीतील तब्बल ९३८ घरांसाठी महापालिकेने मागविले अर्ज

पिंपरी आणि आकुर्डीतील तब्बल ९३८ घरांसाठी महापालिकेने मागविले अर्ज

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचा प्रकल्प, १ महिना नागरिकांना अर्ज करण्याची मुदत

केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आकुर्डी आरक्षण क्र. २८३ व पिंपरी आरक्षण क्र. ७७ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांसाठी महानगरपालिकेच्या हद्दीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात येणाऱ्या नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागवून, छाननी करुन लाभार्थी निश्चित करण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे नियोजन आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांनी २८ जून पासून प्रकल्पातील घरासाठी अर्ज करावा असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

या प्रकल्पातील आकुर्डी येथे एकूण ५६८ सदनिका असणार आहेत. यातील लाभार्थ्याला मिळणाऱ्या एका सदनिकेची किंमत ९ लाख ८५ हजार २५५ रुपये असणार आहे. तर पिंपरी येथे ३७० सदनिका असणार आहेत. त्याची किंमत १० लाख ४२ हजार ६९९ रुपये असणार आहे. यामध्ये सर्वसाधारणसाठी ५०% टक्के, अनुसूचित जाती (SC-१३%), अनुसूचित जमाती (ST-७%) आणि इतर मागास प्रवर्ग ३० टक्के तसेच ५% दिव्यांग समांतर आरक्षण आहे.

प्रकल्पांसाठी ऑनलाईन अर्ज करणेस व अनामत रक्कम भरणेकामी नागरिकांना २८ जून ते २८ जुलै २०२३ पर्यंत (१ महिना) कालावधी देण्यात येईल. सदर कालावधीतच अर्ज केलेल्या नागरिकांचे पात्रतेविषयक कार्यवाही पुर्ण करण्यात येईल. अर्जदारांनी अर्जकरण्यासाठी https://pcmc.pmay.org संकेतीक स्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुर्ण करावी. नागरिकांकडून अर्जासोबत १० हजार रुपये इतकी अनामत रक्कम घेण्यात येणार आहे. तसेच नोंदणी शुल्क ५०० रुपये असे एकुण १० हजार ५०० रुपये जमा करायचे आहे.

नागरिकांकडुन सर्वसाधारण कागदपत्रे उदा. आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर (सर्व कुंटुंबाचे) अपलोड झाल्यानंतर त्यांना अनामत आणि नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहे. सदर रक्कम यशस्वीरित्या भरल्यानंतर पुढील उर्वरीत कागदपत्रे अपलोड करावयाची आहे. सोडतीमध्ये ९३८ सदनिकांची विजेता यादी असेल आणि प्रतीक्षा यादी १ असणार आहे. सदर सोडतीमध्ये विजेता न झालेल्या व प्रतिक्षा यादीमध्ये नाव न आलेल्या नागरिकांचे अनामत रक्कम नमुद केलेल्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने १० हजार रुपये परत करण्यात येणार आहे. आकुर्डी व पिंपरी येथील प्रकल्पांकरिता ऑनलाईन अर्ज करताना नागरिकांनी खालील तक्त्यामधील नमुद कागदपत्रे अपलोड करावयाचे आहेत. सोडतीनंतर निश्चित झालेल्या लाभार्थ्यांनी मूळ कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचे नाव निवड यादीमधून वगळण्यात येईल.

याबाबत बोलताना सहायक आयुक्त अण्णा बोदडे म्हणाले की, येत्या २८ जूनपासून नागरिकांना अर्ज करता येणार आहेत. २८ जुलैपर्यंत म्हणजे १ महिना नागरिकांना अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.  सदनिका वाटप नियमावलीमध्ये बदल किंवा वाढ करण्याचे अधिकार हे महापालिका आयुक्त यांना राहतील. नागरिकांनी नियम, अटी पडताळून पहावेत. तसेच त्रयस्थ व्यक्तींच्या कोणत्याही आमिषांना बळी पडू नये.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest