मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना सुनावले खडेबोल

पिंपरी-चिंचवड शहरातील खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर खड्ड्यांवर लक्ष देऊन तत्काळ बुजवण्यात यावेत, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त शेखर सिंह यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यामुळे आयुक्तांनी मंगळवारी (दि. ६) झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत खड्ड्यांबाबत जाब विचारला. तसेच तातडीने खड्डे बुजवून अहवाल देण्याचे निर्देश दिल्याचे माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

शहरातील खड्ड्यांवरून प्रशासनाची घेतली हजेरी, तत्काळ खड्डे बुजवून अहवाल सादर करण्याची आयुक्तांची विभागप्रमुखांना सूचना

पिंपरी-चिंचवड शहरातील खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर खड्ड्यांवर लक्ष देऊन तत्काळ बुजवण्यात यावेत, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त शेखर सिंह यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यामुळे आयुक्तांनी मंगळवारी (दि. ६) झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत खड्ड्यांबाबत जाब विचारला. तसेच तातडीने खड्डे बुजवून अहवाल देण्याचे निर्देश दिल्याचे माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवल्याचे दावे केले जातात. प्रत्यक्षात थोडा पाऊस झाला की, रस्त्याची चाळण होण्यास सुरुवात होते. रस्ते खोदकामास १५ मे नंतर परवानगी दिली जात नसल्याचे सांगितले जाते. मात्र, अत्यावश्यक कामांच्या नावाखाली पावसाळ्यात बिनधास्तपणे खोदकाम सुरू असते. सध्या तर महापालिकेच्या मुख्यालयासमोरच खोदकाम सुरू आहे. अगोदर खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त असताना त्यात खोदकामामुळे अरुंद झालेल्या रस्त्यांची भर पडते. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत सातत्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

दरम्यान, शहरातील रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, चिखली, निगडी, भोसरी, चऱ्होली, तळवडे, ताथवडे, वाकड, सांगवी यांसह शहराच्या वेगवेगळ्या भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. हिंजवडी आयटी नगरीतील रस्त्यांवरही खड्डेच खड्डे आहेत. वाकडमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरदेखील खड्डे आहेत. हे खड्डे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नजरेतून सुटले नसल्याने महापालिकेचे पितळ उघडे पडले असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest