PMPML : पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना महापालिकेत घेण्याचा घाट

विरोधात ठराव असतानाही सामावून घेण्याची ११४ कर्मचाऱ्यांची मागणी, राजकीय हितासाठी नेत्यांच्या हालचाली पिंपरी-चिंचवड महापालिकेत (Pimpri-Chinchwad Municipal Corporatio) आम्हाला समावून घ्या, अशी मागणी पीएमपीएमएलच्या (PMPML) ११४ कर्मचाऱ्यांनी केली आहे.

PMPML

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना महापालिकेत घेण्याचा घाट

विरोधात ठराव असतानाही सामावून घेण्याची ११४ कर्मचाऱ्यांची मागणी, राजकीय हितासाठी नेत्यांच्या हालचाली पिंपरी-चिंचवड महापालिकेत (Pimpri-Chinchwad Municipal Corporatio) आम्हाला समावून घ्या, अशी मागणी पीएमपीएमएलच्या (PMPML) ११४ कर्मचाऱ्यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या या मागणीनंतर नुकतीच मुंबईमध्ये मंत्रालयात बैठक झाली असल्याची माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली.

पीएमपीएमएलच्या ११८ कर्मचाऱ्यांना यापूर्वीच महापालिकेतील विविध विभागात समावून घेतले आहे. तेव्हाच भविष्यात एकाही पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्याचा पालिकेत समावेश केला जाणार नाही, असा ठराव करण्यात आलेला आहे. मात्र, आता नव्याने ११४ कर्मचाऱ्यांनी आमचा महापालिकेत समावेश करावा, अशी मागणी केली आहे.

वास्तविक हे सर्व कर्मचारी वाहन कार्यशाळेशी संबंधित आहे. महापालिकेच्या वाहन कार्यशाळेला सध्या कर्मचाऱ्यांची आवश्यकताच नाही, असा अहवाल कार्यशाळा विभागाने दिला आहे. मात्र,  एका नेत्याच्या आग्रहास्तव या कर्मचाऱ्यांना महापालिकेत समावेश करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयाेजन करण्यात आले होते. या बैठकीला महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील हजेरी लावली.

महापालिकेचे कमी झालेले उत्पन्न आणि सध्याच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पगार तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी पेन्शन यामुळे तिजोरीवर मोठा भार पडत आहे. त्यामुळे नव्याने कोणत्याही कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे. मात्र, निवडणुका आणि राजकीय हित जपण्यासाठी आता कामगारांना पीएमपीएमएलच्या पगारावरून काढून महापालिकेत समाविष्ट करण्याचा घाट घातला जात आहे.

दुसरीकडे हे कर्मचारी पूर्वी महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या पीसीएमटी मध्ये कार्यरत होते. त्यामुळे त्यांना महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी हरकत काय असा सवाल देखील काही कामगारांकडून उपस्थित केला जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest