शाई लावलेले बोट दाखवा अन् डिस्काउंट मिळवा

यंदा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपयोजना आणि जनजागृती करण्यात येत आहे. मात्र आता मतदानाची टक्केवारी वाढावी आणि अधिक लोकांनी मतदान करावे, यासाठी खास ऑफर देण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

मतदानाचा पुरावा दाखवा आणि ३० ते ५० टक्के सवलतीचा लाभ मिळवा, व्यावसायिकांकडून राबवला जातोय उपक्रम

पंकज खोले
यंदा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपयोजना आणि जनजागृती करण्यात येत आहे. मात्र आता मतदानाची टक्केवारी वाढावी आणि अधिक लोकांनी मतदान करावे, यासाठी खास ऑफर देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरातून नाष्ट्यापासून ते जेवणाच्या थाळीपर्यंत विविध आकर्षक ऑफर देण्यात आली आहे. हातावरची शाई दाखवल्यानंतर या ऑफरचा लाभ मिळणार आहे.

मतदारांनी त्यांचे शाई लावलेले बोट दाखवले तर ३० ते ५० टक्क्यांची सूट मिळणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदवावा आणि निवडणुकीचा टक्का वाढावा, यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. शहरातील कापड व्यावसायिक, हॉटेलचालक, चहाची टपरी, कॅफे, केश कर्तनालय त्यासोबतच मेडिकल दुकानातदेखील ऑफर ठेवण्यात आली आहे.

पुण्यातील कर्वेनगर या ठिकाणी जुन्या रिक्षा खरेदीवर २० हजारपर्यंत डिस्काउंट देण्यात आले आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड येथील पिंपळे सौदागर येथील एका हॉटेलमध्ये केवळ २९ रुपयांमध्ये नाश्ता मिळणार आहे. त्याचप्रमाणे सदाशिव पेठ येथील दुकानात शाई दाखवल्यानंतर मोफत मठ्ठा मिळणार आहे. 

त्याचप्रमाणे भोसरी परिसरातील एका टपरीवर मोफत चहादेखील वाटप करण्यात येणार आहे. या सर्व ऑफर १३ मे पर्यंत असणार आहेत. त्यामुळे शहरवासीयांनी बाहेर पडून मतदान करावे, हा प्रमुख उद्देश या ऑफर मागे असणार आहे.

ऑनलाइन भन्नाट ऑफर

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ऑनलाइन खाद्य पदार्थांचे साखळी दालन असलेल्या कंपन्यांच्या मार्फत ऑफर ठेवण्यात आली आहे. एका पिझ्झावर एक पिझ्झा फ्री, तर ३० ते ५० टक्के ऑनलाइन फूड ऑर्डरवर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मोफत घरपोच सेवा देखील ठेवण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest