शिवस्वराज्य' यात्रेचा आज प्रारंभ

भ्रष्टाचार, कायदा सुव्यवस्था, शेतक-यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई यासह विविध प्रश्न सोडवण्यात राज्यातील महायुतीचे सरकार अपयशी ठरले आहे. याच प्रश्नावर आवाज उठवून जनतेत जनजागृती करण्यास राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी शिवस्वराज्य यात्रा - २ घोषणा करण्यात आली. या शिवस्वराज्य यात्रेचे ९ आॅगस्टला भोसरी येथे सायकांळी सात वाजता स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भोसरी विधानसभा मतदारसंघात होणार पहिली जाहीर सभा

भ्रष्टाचार, कायदा सुव्यवस्था, शेतक-यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई यासह विविध प्रश्न सोडवण्यात राज्यातील महायुतीचे सरकार अपयशी ठरले आहे. याच प्रश्नावर आवाज उठवून जनतेत जनजागृती करण्यास राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी शिवस्वराज्य यात्रा - २ घोषणा करण्यात आली. या शिवस्वराज्य यात्रेचे ९ आॅगस्टला भोसरी येथे सायकांळी सात वाजता स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रकाश म्हस्के, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक राहुल भोसले, सुलक्षणा शिलवंत, गीता मंचरकर, गणेश  भोंडवे, देवेंद्र तायडे, विशाल काळभोर, ज्ञानेश आल्हाट, धनंजय भालेकर, प्रवीण भालेकर, समीर मासुळकर, तानाजी खाडे, संजय उदावंत, विशाल जाधव, संजय नेवाळे, पंकज भालेकर, वसंत बोराटे, प्रदीप तापकीर, विनायक रणसुभे,  संजय उदावंत, निवृत्ती शिंदे आदी उपस्थित होते. याबाबत माहिती देताना शहराध्यक्ष कामठे म्हणाले की, शिवस्वराज्य यात्रा - २ ची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ९ ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावरून यात्रेला सुरुवात होणार आहे.  यानंतर महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा २ मार्गक्रमण करेल. ही यात्रा पिंपरी-चिंचवड शहरातून मार्गस्थ होणार आहे.  यापैकी भोसरी येथे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता लांडेवाडी येथे ही सभा पार पडेल.

अजित गव्हाणे म्हणाले की, राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. बेरोजगारी वाढली आहे. अनेक ठिकाणी भ्रष्टाचार , गुंडगिरीने अक्षरशः थैमान घातले आहे.  आपले पिंपरी-चिंचवड देखील या गोष्टीला अपवाद राहिलेले नाही.  ज्या भोसरी मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा मार्गक्रमण करणार आहे . त्या ठिकाणी भ्रष्टाचार, दहशत , दबाव तंत्राने अक्षरशः कळस गाठला आहे .त्यामुळे या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रा नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम करणार आहे. भोसरीमध्ये ही यात्रा आल्यानंतर यात्रेचे रूपांतर सभेमध्ये होणार आहे. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता लांडेवाडी चौकात सभा पार पडली.  या सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते देखील मार्गदर्शन करतील.

या मतदारसंघातून जाणार यात्रा

जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, भोसरी, शिरूर, हडपसर, खडकवासला, दौंड, इंदापूर, बारामती, माळशिरस, मोहोळ, सोलापूर उत्तर, माढा, करमाळा, परांडा, तुळजापूर, उदगीर, अहमदपूर, केज, आष्टी, बीड, माजलगाव, परळी, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, वसमत, घनसावंगी, बदनापूर,  भोकरदन या भागातून शिवस्वराज्य यात्रा मार्गक्रमण करणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest