रेशनिंगच्या तांदळाची खुल्या बाजारात विक्री, २७ लाखाचा मुद्देमाल जप्त

रेशनिंगच्या तांदळाची खुल्या बाजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावरून मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन ट्रकसह २७ लाख ६२ हजार ३१२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 21 Jun 2023
  • 01:04 pm
रेशनिंगच्या तांदळाची खुल्या बाजारात विक्री, २७ लाखाचा मुद्देमाल जप्त

संग्रहित छायाचित्र

शिरगाव पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

रेशनिंगच्या तांदळाची खुल्या बाजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावरून मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन ट्रकसह २७ लाख ६२ हजार ३१२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी ५ जणांविरोधात शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक लक्ष्मण सोळसकर (रा. रुही ता. कोरेगाव जि सातारा), सचिन वसंत धुमाळ (रा. भाडवे ता. कोरेगाव जि सातारा), राजु नागनाथ केंद्र (रा. कदारेवाडी ता. कंदार जि. नांदेड), गौरव सुंबे (रा. काळेपडळ हडपसर जि पुणे) आणि शहा (पुर्ण नाव माहित नाही रा. वडगाव निंबाळकर ता. बारामती जि. पुणे) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार तुकाराम चिंधु साबळे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव संबे यांच्या मालकीचा रेशनिंगचा तांदुळ आरोपींनी पॉलिथिन बॅगमध्ये भरला. त्यानंतर खुल्या बाजारात विकण्यासाठी मध्यरात्री दोन ट्रकमधून घेवून जात होते. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जात असताना उर्से टोलनाक्यावर शिरगाव पोलीसांनी ट्रक आडवला. त्यानंतर तपासणी केल्यानंतर रेशनिंगचा तांदुळ असल्याचे समजले. पोलीसांनी १८ लाख रुपयांचे दोन ट्रक आणि ९ लाख ६२ हजार रुपये किमतीचा इतर माल असा एकूण २७ लाख ६२ हजार ३१२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपींविरोधात शिरगाव पोलीस ठाण्यात अत्याआवश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणचा अधिक तपास शिरगाव पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest